

निपाणी (वार्ता) : दोन दिवसांपासून दीपावली उत्सवास अभूतपूर्व उत्साहात सुरवात झाली आहे. काही कुटुंबीयांनी सोमवारी ओवाळणीचा कार्यक्रम आटोपला. सोमवारी (ता. २०) नरक चतुर्दशी झाली. त्यानिमित्त पहाटे अभ्यंगस्नान करून दिवाळी साजरी करण्यात आली. या दिवशी अनेक कुटुंबीयांनी आपला भाऊरायाला ओवाळणी केली. मंगळवारी (ता. २१) लक्ष्मीपूजन असून, त्यानिमित्त बाजारपेठेसह घराघरांत चैतन्य अवतरले आहे.
नरक चतुर्दशी हा हिंदू धर्मातील दिवाळीतील एक महत्त्वाचा सण समजला जातो. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला उत्साहात साजरा होतो. त्यानिमित्ताने सोमवारी (ता.२०) पहाटे पहिले अभ्यंगस्नान झाले. ही परंपरा आजही अनेक घरांमध्ये पाळली जात आहे. यात कारीटला नरकासुराचे प्रतीक मानले जाते. श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला, याचे प्रतीक म्हणून नरक चतुर्दशीच्या दिवशी मंगळवारी लक्ष्मीपूजन असून, सायंकाळी सूर्यास्तानंतर सहा ते साडेआठ हा शुभमुहूर्त असल्याचे सांगण्यात आले आहे.
बुधवारी (ता. २२) दीपावली पाडवा सकाळी ६.२३ ते ७.५० (लाभ), सकाळी १०.४४ ते दुपारी १२.११ (शुभ), त्यानंतर दुपारी दुपारी चार ते सायंकाळी ६.५९ (शुभ) गुरुवारी भाऊबीज असून सकाळी ९.१३ ते दुपारी ३.२८ शुभ मुहूर्त आहे. रविवारी (ता. २६) पंचमी असून सकाळी ९.१७ ते १०.४४ (लाभ) तसेच १०.४४ ते दुपारी १२.१० अमृतयोग असल्याचे पंचांग कर्त्यांनी म्हटले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta