
नगरसेवक विलास गाडीवड्डर : केतेश्वर समाजभवनाचा वास्तुशांती समारंभ
निपाणी (वार्ता) : बुरुड समाजाच्या मागणीनुसार आठ वर्षांपूर्वी येथील महाबळेश्वरनगर परिसरात समुदायभावनासाठी चार गुंठे जागा नगरपालिकेतर्फे दिली होती. शिवाय दहा लाखाचा निधीही मंजूर केला होता. या समाजभावनाचे बांधकाम पूर्ण झाले असून पुढील कामकाजासाठीही निधी मंजूर करणार आहोत. समाज बांधवांनी एकत्रित राहून समाजाची प्रगती करावी. या पुढील समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे ग्वाही नगरसेवक विलास गाडीवड्डर यांनी दिली. बुरुड समाजाच्या केतेश्वर समाजभवनाच्या वास्तुशांती सोहळ्यात ते बोलत होते.
सकाळी सुबोध कुलकर्णी यांच्या पौरोहित्याखाली दहा जोडप्यांच्या हस्ते होम पूजन करण्यात आले. त्यानंतर मानवीरांच्या हस्ते समाजभवनाच्या कोनशिलेचे अनावरण झाले. उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर यांनीही समाजाच्या सर्वांना विकासासाठी प्रयत्नशील असून या पुढील काळातही नगरपालिकेच्या माध्यमातून मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास सभापती डॉ. जसराज गिरे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चव्हाण, विजय शेटके, माजी नगरसेवक दिलीप पठाडे, अनिता पठाडे, मीनाक्षी बुरुड, राजेश कोठडीया, धनाजी निर्मळे, प्रसाद बुरुड, महेश सूर्यवंशी, चिक्कोडीचे नगरसेवक नागराज मेदार, समाजाचे अध्यक्ष संतोष सूर्यवंशी, उपाध्यक्ष राजेंद्र मांजरेकर, सेक्रेटरी संजय साळुंखे, संचालक संदीप सूर्यवंशी, चंद्रकांत कुकडे, प्रदीप सूर्यवंशी, प्रभाकर बुरुड, विनायक वडे, सागर नाकोळे, विनायक सुळकुडे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते. विजय बुरुड यांनी सूत्रसंचालन केले.
Belgaum Varta Belgaum Varta