
ट्रान्सफार्मरमुळे लागली आग; हेस्कॉनसह पोलीस ठाण्यातर्फे पंचनामा
निपाणी (वार्ता) : सध्या ऊसाचा गळीत हंगाम सुरू असून सकाळी दहा नंतर उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. अशातच भोज येथील ट्रान्सफार्मर मुळे सर्वे क्रमांक २७० मधील साडेतीन एकरातील ऊस जळून खाक झाला आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे सुमारे दोनशे टन ऊसाचे नुकसान झाले असून पाच लाख रुपये पर्यंत त्यांना भुर्दंड ससला आहे.
त्याबाबत घटनास्थळासह पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, भोज येथील सर्वे क्रमांक २७०/२ मधील गोपाळ मिटके यांचे एक एकर, सर्वे क्रमांक २७०/१ मधील रुपेश नाईक यांचे २० गुंठे, सर्वे क्रमांक २७०/१ मधील अजय नाईक यांचे २० गुंठे आणि सर्वे क्रमांक २७० मधील संजय आर्वे यांची एक एकर शेतातील ऊस जळून खाक झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच तलाठी मोमीन सनदी, ग्राम सहाय्यक भैरू पाटील, हेस्कॉन कर्मचारी उमेश माळी यांच्यासह सदलगा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते रमेश पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. यावेळी संघटनेचे शितल बागे, शिवगोंडा पाटील, रामचंद्र मतिवडे, सहदेव नाईक यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta