
निपाणी (वार्ता) : शहराच्या पश्चिमेस असलेल्या बसवनगर परिसरात काही दिवसांपूर्वी पिसाळलेल्या श्वानांनी अनेकांवर हल्ले करून सुमारे ११ नागरिकांना जखमी केले होते. घटनेनंतर तातडीने उपचार करून पीडितांना मदत मिळावी, यासाठी नगरपालिकेकडून विशेष प्रयत्न करण्यात आले. त्यानुसार सर्व जखमी नागरिकांना नगरपालिका माध्यमातून आर्थिक मदत म्हणून बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, नगरसेवक रवींद्र शिंदे, सुजय पाटील, दीपक सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत धनादेशांचे वाटप करण्यात आले.
यावेळी मान्यवरांनी बसवनगरमधील शोभा देवडकर, अंजना बुरुड, रवी कोरगावकर, आर्यन यादव, रोहित पारळे, जनाबाई मगदूम, बाळकृष्ण पाटील, पार्वती डवरी यांच्याकडे मदतीचे धनादेश सुपूर्द केले. शिवाय भविष्यात अशा संकटांच्यावेळी मदतीचे आश्वासन दिले. बसवनगरमधील नागरिकांसह जखमी कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले.
Belgaum Varta Belgaum Varta