
अध्यक्ष आकाश माने यांची माहिती ; ग्रुपतर्फे पोशाख, मुक्कामाचा खर्च
निपाणी (वार्ता) : प्रतिवर्षी तालुक्यातील शिवप्रेमींना गडकोट मोहीम घडवणाऱ्या ‘मावळा ग्रुप’ची यंदाची मोहीम ही छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधलेल्या तोरणा किल्यावर होणार आहे. शुक्रवारी (ता.२६) व शनिवारी (ता.२७ डिसेंबर) ही मोहिम होणार आहे. त्यासाठी नोंदणी सुरू असून शिवप्रेमी युवक, युवती व महिलांनी मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन ‘मावळा’ ग्रुपचे अध्यक्ष आकाश माने यांनी केले आहे. मावळा ग्रुपच्या कार्यालयात आयोजीत बैठकीत ते बोलत होते. यावेळी ग्रुपचे उपाध्यक्ष राहुल भाटले-सडोलकर, सल्लागार संजय चिकोडे, उदय शिंदे, दयानंद सञ्जनावर, पुंडलिक निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.
मोहिमेमध्ये शिवप्रेमींच्या राहण्याचा जेवणाचा पोषाखाचा खर्च हा मावळा ग्रुपतर्फे केला जाणार आहे. ‘अजिंक्यतारा’ ‘तोरणा’ मोहीम काढली जाणार असून त्याचे तयारी सुरू आहे. मोहिमेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या मावळ्यांनी अधिक माहितीसाठी नरवीर तानाजी चौक येथील कार्यालयात संपर्क साधावा.
बैठकीस उत्सव कमिटी अध्यक्ष क्षमहादेव बन्ने, कार्याध्यक्ष हेमंत चव्हाण, उपाध्यक्ष नवनाथ खवरे, उपाध्यक्ष विजय बुरुड, खजिनदार सुशांत कांबळे, समन्वयक दादा जनवाडे, संचालक शांतिनाथ मुदकुडे, संगमेश जाधव, अनिल चौगुले, पृथ्वीराज घोरपडे, राहुल पाटील, उमेश गंथडे, विनायक खवरे, अमृत ढोले, महेश कानडे, सागर खांबे, आकाश चव्हाण यांच्यासह संचालक पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta