
निपाणी (वार्ता) : येथील कोडणी रोडवरील अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इको-करेजच्या संस्थापिका त्वचारोग तज्ञ डॉ. राजश्री चौगुले यांच्या नेतृत्वाखाली टेराकोटा कार्यशाळा पार पडली. संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
कार्यशाळेसाठी शाळेच्या प्राचार्या चेतना चौगुले यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे सिरॅमिक इंजिनियर गजानन मराठे व विजय माळगे यांनी टेराकोटासाठी लागणारी माती, त्याचे महत्व सांगितले. शिवाय विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या कलाकृतींचे प्रशिक्षण दिले. करिअरमध्ये रूपांतरित करून आयुष्यात कसे यशस्वी होऊ शकतो याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे पॉट, मातीच्या वस्तू, प्राणी व अन्य वस्तू बनविण्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संचालक डॉ. उत्तम पाटील, डॉ. ज्योतीराम चौगुले, संस्थेचे सेक्रेटरी डॉ. अमर चौगुले यांच्यासह शिक्षकांचे सहकार्य लाभले.
Belgaum Varta Belgaum Varta