

निपाणी (वार्ता) : येथील फ्रेंड्स ग्रुपतर्फे दिवंगत माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या प्रेरणेने हिमांशू उर्फ शशांक पाटील यांच्या स्मृतिप्रत्यर्थ आयोजित ‘चेअरमन चषक’ ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट क्रिकेट स्पर्धेचे बुधवारी (ता.२६) उद्घाटन करण्यात आले.
स्वप्निल पावले यांनी स्वागत केले. येथील समर्थ मंडळ व्यायाम शाळेच्या मैदानावर आयोजित उद्घाटन प्रसंगी सहकाररत्न डॉ. सी. बी. कुरबेट्टी यांच्या हस्ते मैदान पूजन, माजी मंत्री दिलीप कुमार पाटील यांच्या हस्ते एसटीचे पूजन झाले. सुजय पाटील व सुरेश घाटगे यांच्या हस्ते नाणेफेक झाल्यानंतर कोगनोळी आणि वाठार या संघात पहिला सामना झाला. स्पर्धेतील विजेत्या संघांना अनुक्रमे प्रथम ते चतुर्थ क्रमांकासाठी ५१ हजार रुपये, ३१ हजार रुपये रुपये, १० हजार, १० हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. याशिवाय मॅन ऑफ दि मॅचसाठी (फायनल) ५ हजार रुपये, मॅन ऑफ दि सेरीजसाठी सायकल बक्षीस देण्यात येणार आहे.
यावेळी चिक्कोडी टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष संयोगित उर्फ निकु पाटील, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, किरण कोकरे, प्रशांत नाईक, दीपक वळीवडे, रमेश घाटगे, प्रतिक शहा, संदीप चावरेकर, रमेश भोईटे, ॲड. संजय चव्हाण, चंद्रकांत जासूद, पुंडलिक कुंभार, सतीश शिरगावे, किरण पाटोळे, विनोद बल्लारी यांच्यासह दौलतराव पाटील सोशल फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सागर पाटील यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta