

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर -सरकार यांच्या राजवाड्यास इस्त्रोचे संचालक डॉ. व्यंकटेश्वर शर्मा दांपत्यासह कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंडळाचे संचालक गणेश नेर्लीकर यांनी सदिच्छा भेट दिली.
माजी नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनी स्वागत केले. त्यानंतर डॉ.व्यंकटेश्वर शर्मा दाम्पत्यानी राजवाड्यातील तुळजाभवानी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यांनी राजवाडा आणि भुईकोट किल्ला पाहून समाधान व्यक्त केले. शिवाय जुन्या काळातील आठवणींना उजाळा दिला. विद्या संवर्धक संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, समीर बागेवाडी, सुनील पाटील, बंडा घोरपडे, प्रशांत केस्ती, अभिजीत कासार -मुदकुडे यांच्यासह मान्यवरांनी डॉ. शर्मा, गणेश नेर्लीकर यांचा सत्कार केला. यावेळी श्रीमंत सम्राज्यलक्ष्मीराजे निपाणकर-सरकार, श्रीमंत विजयराजे निपाणकर, श्रीमंत राजेश्वरीराजे निपाणकर, सुनील दळवी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta