
अध्यक्ष प्रकाशभाई शहा यांची माहिती; अत्यंत माफत दरात केली सोय
निपाणी (वार्ता) : येथील कोठीवाले कॉर्नर वरील मास्क ग्रुप संचलित डॉ. वैशाली व डॉ. विलास पारेख यांच्या महावीर आरोग्य सेवासंघातर्फे शुक्रवार (५ डिसेंबर) ते सोमवार (ता.८ डिसेंबर) अखेर महाआरोग्य शिबिर होणारआहे. सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत अत्याधुनिक मशीनरीद्वारे रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. शहरात प्रथमच आयोजित या महाआरोग्य शिबिराचा शहर आणि परिसरातील गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रकाश भाई शहा यांनी केले. रविवारी (ता.३०) सायंकाळी आयोजित बैठकीत ते बोलत होते.
शहा म्हणाले, एकाच वेळी एकाच छताखाली विविध प्रकारच्या २३६ चाचण्या होणार आहेत. यावेळी हार्ट प्रोफाइल, मूत्रपिंड, थायरॉईड, यकृत, मधुमेह, व्हिटॅमिन्स, कर्करोग अशा महत्त्वाच्या तपासण्यांचा समावेश आहे. हॉस्पिटलमध्ये विविध सुविधा उपलब्ध करून दिले आहेत. सहा वर्षात सहा लाख रुग्णांनी येथील सेवेचा लाभ घेतला आहे. युगंधर मेहता यांनी सुसज्ज लॅबोरेटरीची सोय केली आहे. येथील हॉस्पिटलमध्ये पुण्यानंतर निपाणीतच अत्याधुनिक मशिनरींची सोय असल्याचे सांगितले.
प्रा.सुगम चव्हाण यांनी, अत्यंत कमी खर्चात विविध चाचण्या करून अहवाल दिला जाणार आहे. तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांनी तपासणीपूर्वी दहा ते बारा तास उपाशी राहणे आवश्यक असून इच्छुकांनी महावीर आरोग्य सेवा संघात नाव नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
बैठकीस संस्थेचे उपाध्यक्ष सतीशभाई वखारीया, सेक्रेटरी मिलिंद मेहता, सुजल मेहता, सुरज राठोड, सागर शहा, सुजित स्वामी, रितेश शहा यांच्यासह महावीर आरोग्य सेवा संघाचे पदाधिकारी व संचालक उपस्थित होते. प्रतीक शहा यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta