
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या (मल्टिस्टेट) ढोणेवाडी शाखेच्या संचालकपदी शिवानंद सादळकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यानिमित्त त्यांचा येथील पी.के.पी.एस. सभागृहात सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ढोणेवाडी ग्रामस्थांतर्फे मान्यवरांच्या हस्ते उत्तम पाटील यांचाही सत्कार करण्यात आला.
उत्तम पाटील यांनी मनोगतातून सहकार क्षेत्राबद्दल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास विजय माने, बाबासाहेब खोत, खानू दुगाणे, निंगाप्पा बारवाडे, मल्लू सदलगे, सुशांत मेक्कळके, किरण सादळकर, बाबासाहेब लोहार, सुरज खोत, श्रीनाथ गुरव, सुनील सदलगे, सुरज खोत, रणजित घाटगे, ओंकार चव्हाण, राजू सासणे, सोमनाथ गुरव, ओंकार सासणे, सोमनाथ दुधाने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta