
निपाणी (वार्ता) : ऊस पिकापासून सरकारला जाणाऱ्या करातून प्रति टन उसाला किमान २००० रुपये राज्य सरकारने -१००० रुपये आधारभूत किंमत देण्यात यावी. कारखान्यांनी संगणकीकृत डिजिटल वजन यंत्र बसून तात्काळ पावत्या याची व्यवस्था करावी. कृषी पंपासाठी सात ऐवजी दहा तास करावा. मका आणि सोयाबीन खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (ता.११) निपाणीत चाबूक मोर्चा काढून बेळगाव विधानसभा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांनी धडक दिली.

राजू पोवार यांनी, रासई शेंडूर, गोंडीकुप्पी, यरनाळ, तवंदी गव्हाण, अंमझझरी, शिरगुप्पी, बुदलमुख, पांगिरेज्ञ(बी) गावात पिण्यासह शेती पाणीपुरवठा राबवावी. विज पुरवठ्याच्या जुन्या विद्युत वाहिन्यायामुळे ऊसाला आगी लागत आहेत. अतिवृष्टी, पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या पिकांना भरपाई देऊन कर्जमाफीसह कर्जवसुली थांबवावी.साखर दुर्लक्षित सिंचन प्रकल्पांचे पुनरुज्जीवनासह नवीन सिंचन प्रकल्पांची अंमलबजावणी करावी.
स्वामीनाथन आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी पोवार यांनी केली.
येथील अक्कोळ क्रॉसपासून मोर्चाला प्रारंभ झाला. धर्मवीर संभाजीराजे चौकात मानवी साखळी करून चाबकाचे फटकार उडविण्यात आले. बेळगाव नाक्यावर मोर्चा आल्यानंतर उप तहसीलदार मृत्युंजय डंगी, उपनिरीक्षक रमेश पवार यांना निवेदन देण्यात आले. डंगी यांनी निवेदन स्वीकारून वरिष्ठाकडे पाठविण्याची ग्वाही दिली. त्यानंतर मोर्चेकरी बेळगावच्या दिशेने रवाना झाले.
मोर्चात अशोक क्षीरसागर, रमेश पाटील, सर्जेराव हेगडे, नितीन कानडे, सुभाष चौगुले, बाळासाहेब ऐवाळे, कालगोंडा कोटगे, एकनाथ सादळकर, सुखदेव मगदूम, मधुकर पाटील, ईश्वर कुंभार, चिनू कुळवमोडे, बाबासाहेब पाटील, शिवाजी वाडेकर, पिंटू लाड, सागर पाटील, अनिल गायकवाड, नामदेव साळुंखे, मयूर पोवार, आनंदा गायकवाड, संजय पोवार, श्रीधर पाटील, सिध्दगोंडा पाटील, विजय गुरव यांच्यासह निपाणी तालुक्यातील संघटनेच्या शाखांचे पदाधिकारी व शेतकरी सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta