निपाणीत हॉटेलवर कारवाई : पाच महिलांची सुटका
निपाणी : येथील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या वेश्या अड्ड्यावर शनिवारी(ता.२६) रात्री उशिरा शहर पोलिसांच्या विशेष पथकाने छापा टाकून आठ जणांवर कारवाई केली. यामध्ये एका परदेशी महिलेचा समावेश आहे. मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
सदर हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती विशेष पोलिस पथकाला मिळाली होती. त्यानुसार संगमेश शिवयोगी, शहर पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक कृष्णवेणी गुर्लहोसूर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सापळा रचला. यावेळी मालक संजय भैरप्पा माळी (वय ३५, रा. संकेश्वर), कर्मचारी अरुण जयपाल शेकन्नावर (वय ३४, रा. हुक्केरी) व परशराम खंडोबा चव्हाण (वय ३५, रा. पिंपळे) यांच्यासह पाच महिला आढळून आल्या. घटनास्थळावरून सर्वांना ताब्यात घेऊन न्यायालयापुढे हजर केले. न्यायालयाने पाच महिलांची रवानगी बेळगाव येथील महिला सुधारगृहात केली. संजय, अरुण व प्रशांत यांना अटक करून पुढील तपास चालविला असल्याची माहिती मंडल पोलीस निरीक्षक शिवयोगी यांनी दिली. पाच महिलांपैकी चौघी कोल्हापूर तर गडहिंग्लज येथील तर एक महिला असल्याची माहिती शिवयोगी यांनी दिली.
Belgaum Varta Belgaum Varta