

बग्यास वाहतुकीच्या ट्रकला शॉर्टसर्किटने आग ; लाखोंचे नुकसान
निपाणी (वार्ता) : निपाणी येथून गोकाककडे बग्यास भरून जाणाऱ्या ट्रकला शॉर्टसर्किटने पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कणगला जवळ शनिवारी (ता.२०) सायंकाळी साडेचार वाजता घडली. या घटनेत जीवित हानी झाली असली तरी ट्रकच्या पुढील भागाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. निपाणी आणि संकेश्वर येथील अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्परता दाखविल्याने ही आग आटोक्यात आणली. शिवाय देव बलवत्तर म्हणूनच ट्रकमधील चालक व वाहक बचावले आहेत.
याबाबत संकेश्वर पोलीस स्थानकातून मिळालेली अधिक माहिती अशी, निपाणी येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्यामधील बग्यास ट्रक मधून (क्रमांक एम.एच.०९ बी.सी.) गोकाककडे भरून जात होता. राष्ट्रीय महामार्गावरील कन्याला जवळील गोल्डन प्लस हॉटेल परिसरात अचानक शॉर्ट सर्किट होऊन बग्यासला आग लागली. त्याचा वास येताच चालक आणि वाहकांनी ट्रक थांबवून पाहणी केली. तोपर्यंत ट्रकच्या पुढील भागाने पेट घेतला. त्यामुळे भयभीत झालेल्या चालक वाहकांनी निपाणी आणि संकेश्वर येथील अग्निशामक दलाला घटनेची माहिती दिली.
निपाणी आणि संकेश्वर येथील अग्निशामक दलाच्या जवानांनी बंबासह तात्काळ घटनास्थळी गाव घेतली. त्यामुळे आग आटोक्यात आणणे शक्य झाले. तरीही ट्रकच्या पुढील भागासह जळून खाक झाला आहे. घटनेची माहिती मिळताच संकेश्वर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एस.एम. आवजी, शिवनिंग उगार, उदय पुजारी, एम. के. बांगल आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. रात्री उशिरा संकेश्वर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.



Belgaum Varta Belgaum Varta