Tuesday , March 3 2026
Breaking News

पौष पौर्णिमेला अनुभवला ‘सुपर मून’चा नजारा

Spread the love

 

पिठूर चांदणं, उल्कांची आतषबाजी; खगोल प्रेमींना ठरली पर्वणी

निपाणी(वार्ता) : नववर्षाच्या सुरुवातीलाच खगोलप्रेमींसाठी
ट्रिपल धमाका लॉटरी लागावी, तसा खगोलीय योग शनिवारी (ता.३) जुळून आला. थंडीचा महिना, पौष पौर्णिमेच्या मोठ्या चंद्रबिंबाचं (सुपर मून) पिठूर चांदणं, त्यात उल्कांची आतषबाजी, असा अवकाशीय नजारा पाहायला मिळाला. शशी-सूर्याच्या सान्निध्यात वसुंधरेवर काही प्रमाणात उल्कांचा पुष्पवर्षावही झाला.
शनिवारी पृथ्वी सूर्यापासून जवळच्या बिंदूवर, तर पौर्णिमेचा चंद्र सुद्धा पृथ्वीपासून जवळच्या बिंदूवर होता.. या दोन खगोलीय घटना जुळून आलेल्या
असतानाच भूतप तारका समूह दिसणारा उल्का वर्षाव घडला. असा हा खगोलीय घटनांचा तिहेरी योग जुळून आला होता.
सूर्याभोवती लंब वर्तुळाकार कक्षेत फिरणारी पृथ्वी सूर्यापासून
सर्वांत जवळच्या बिंदूवर होती. यावेळी सूर्य पृथ्वी अंतर ९१.४ मिलियन माइल्स होते. सध्या पृथ्वी सूर्यापासून जवळच्या बिंदूवर आहे.असे घडण्यामागे पृथ्वीचा कललेला अक्ष आणि त्यामुळे घडणारे ऋतुचक्र कारणीभूत ठरले.
——————————————————————–

‘भूतप’ तारकासमूहातून घडणाऱ्या उत्का वर्षावाचा अत्युच्च बिंदू याच तारखेला असत्याने, खगोलआणि विज्ञान प्रेमींसाठी हा दिवस म्हणजे ख-या अर्थाने दुग्धशर्करा योगच ठरला. त्याचा अनुभव विद्यार्थी व विज्ञान शिक्षकांनी घेतला.’
-एस.एस.चौगुले, विज्ञान शिक्षक, सिद्धेश्वर हायस्कूल, कुर्ली

About Belgaum Varta

Check Also

निपाणी अक्कोळ रोडवर ‘बर्निंग’ व्हॅनचा थरार

Spread the love  नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले चालकाचे प्राण निपाणी (वार्ता) : भरधाव जाणाऱ्या मारुती व्हॅनने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *