Monday , April 20 2026
Breaking News

थंडी, पोषक वातावरणामुळे आंबा मोहोरला

Spread the love

 

निपाणी भागातील चित्र; आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत

निपाणी(वार्ता) : निपाणी भागात मे महिन्यापासून पंधराड्यापासून सलग पाच महिने पाऊस झाल्याने चालूवर्षी समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. महिन्यापासून आजअखेर बोचरी थंडी वाढत आहे. परिणामी आंब्याची झाडे मोहोरांनी बहरायला लागली आहेत. रब्बीतील पिकांनाही चांगला दिलासा मिळाला आहे. सध्याआंबा बागायतदारांत समाधानकारक वातावरण असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
पाण्याची सोय असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी आंब्याच्या बागा केल्या आहेत.गतवर्षिपेक्षा सर्वच झाडांना सरसकट मोहोर आला आहे. १० वर्षांपूर्वी लागवड केलेल्या बागातील झाडांना सध्या आंबे लागण्यास सुरुवात झाली आहे. पोषक वातावरणामुळे समाधानकारक मोहोर आल्याने आंबा बागायतदारां मध्ये उत्साहाचे वातावरण आहे.यंदा आंबा पिकासाठी वातावरण उपयुक्त आहे. शिवाय थंडीमुळे एक महिना अगोदरच झाडांना मोहोर सुटला आहे. त्यामुळे यंदा आंब्याचे चांगले उत्पादन होईल असा विश्वास आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
——————————————————————–
फोंड्या माळावर फुलवली अमराई
युवा उद्योजक संभाजी कोपार्डे यांनी हंचिनाळ येथील फोंड्या माळावर आमराई फुलवली आहे. दहा वर्षांपूर्वी लागवड केलेल्या बागेत सध्या भरभरून मोहर आला आहे. या बागेची देखभाल तायगोंडा पाटील हे करीत आहेत. याअमराईला निपाणी भागातील अनेक शेतकरी भेट देत आहेत.
——————————————————————–
‘यंदा सुरुवातीपासून आंबा पिकाला वातावरण चांगले आहे. वातावरणातील बदल, अवकाळी या ना कारणाने प्रत्येकवर्षी नुकसान व मोठी वित्तहानी होते. अशावेळी मदत मिळणे आवश्यक आहे.प्रशासन व कृषी विभागाने भेटी देऊन शेतक-यांना मार्गदर्शन करावे.’
-संभाजी कोपार्डे, आंबा बागायतदार शेतकरी, हंचिनाळ

About Belgaum Varta

Check Also

मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे रविवारी (ता.१९) शिवजयंती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *