Sunday , July 26 2026
Breaking News

बहिर्जी शिरोळकर पदवी पूर्व महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

Spread the love

 

बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ, संचलित बहिर्जी शिरोळकर पदवीपूर्व (हंदिगनूर) महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात आणि सांस्कृतिक वातावरणात नुकताच संपन्न झाला.
महाविद्यालय सुधारणा समितीचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत कुऱ्हाडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
ज्योती पदवी पूर्व महाविद्यालयाच्या हिंदी विभाग प्रमुख डॉ. माधवी एस. बागी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
व्यासपीठावर महाविद्यालय सुधारणा समितीचे उपाध्यक्ष श्री. नारायण पाटील, सदस्य श्री. मल्लाप्पा पाटील, श्री. परशुराम पाटील, श्री. मारुती पाटील, श्री. गंगाधर पाटील, श्री. रामणकट्टी, श्रीमती अनिता चौगुले व सरस्वती हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. जी. एस. पाटील उपस्थित होते.
दीप प्रज्वलन व महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
प्राध्यापिका डॉ. विनया कांबळे यांनी महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केला.
वार्षिक क्रीडा स्पर्धा तसेच विविध सांस्कृतिक स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
कु. रोहित हुंदरे व कुमारी पुष्पा सनदी यांना उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. कुमारी प्रिया पाटील (उत्कृष्ट संघटक), कुमारी रसिका वरपे (शैक्षणिक उत्कृष्टता) तर कुमारी ममता कांबळे हिला उत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
प्राध्यापक डॉ. गणपती कांबळे व प्राध्यापक डॉ. परशुराम बसर्गे यांनी उत्कृष्ट विद्यार्थ्यांच्या नावांचे वाचन केले.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ. माधवी एस. बागी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अभ्यास केल्यास उत्कृष्ट यश संपादन करता येते व विद्यार्थ्यांनी आपल्यामधील सुप्त कौशल्य ओळखत आपली एक वेगळी ओळख निर्माण करावी असे विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री चंद्रकांत कुराडे यांनी आपले विचार व्यक्त केले.
व्यासपीठावर उपस्थित इतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व बारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका रितू पाटील यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक दयानंद मगदूम यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *