Tuesday , March 3 2026
Breaking News

निपाणीत उद्यापासून ‘मालक चषक’ क्रिकेट स्पर्धा

Spread the love

 

रात्र -दिवस स्पर्धेची तयारी पूर्ण : विजेत्यांना अडीच लाख रुपयांची बक्षीसे

निपाणी (वार्ता) : शहरातील नवोदित क्रिकेट खेळाडूंना संधी देण्यासाठी येथील रोहन साळवे फाउंडेशन तर्फे बुधवारपासून (ता. ७) ‘मालक चषक’ क्रिकेट स्पर्धा प्रभागानुसार होणार आहे. ही स्पर्धा रविवार अखेर (ता.११) म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर डे-नाईट प्रकारात होणार आहे. त्याची तयारी झाल्याची माहिती संयोजकांनी दिली.
युवा उद्योजक रोहन साळवे यांनी मैदानाची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला. यावेळी साळवे यांच्या हस्ते बॅरिकेड्स आणि प्रकाश ज्योत यंत्रणेचे पूजन झाले. खेळाडू व प्रेक्षकांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था केली आहे. मैदानात १० प्रकाश झोत टॉवर उभारले आहेत. स्पर्धेतील विजेत्या संघांना अडीच लाख रुपयांची बक्षिसे ठेवली आहेत आहेत. सहभागी खेळाडूंना स्मृतीचिन्ह, गणवेश दिले जाणार आहेत.
स्पर्धेतील विजेत्या संघाला ५१ हजार रुपये आणि चषक, उपविजेत्या संघाला ३१ हजार रुपये आणि चषक असे बक्षीस आहे. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकास प्रत्येकी ११ हजार रुपयांचे रोख बक्षिसे, चषक, सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. याशिवाय इतर वैयक्तिक बक्षिसे आहेत. यावेळी अनिल भोसले, अस्लम शिकलगार, लहू मधाळे, किरण पाटोळे, संतोष कांबळे, रघुनाथ नाईकवाडे, केदार कुंभार, अमित जाधव, आँकार बोंगार्डे, संदीप माने उपस्थित होते.
——————————————————————-
स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
शहरात प्रथमच प्रभाग निहाय क्रिकेट स्पर्धा भरविण्यात येत आहेत. संयोजकांनी केलेल्या अहवालानुसार शहरातील प्रत्येक प्रभागातील संघांनी नाव नोंदणी करून स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे या स्पर्धा रंगतदार ठरणार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

आगारातील खड्डे, कचऱ्यावरून आगार प्रमुखांची झाडाझडती

Spread the love  पंचहमी योजना पदाधिकारी आक्रमक आठवड्याभरात समस्या सोडविण्याच्या सूचना निपाणी (वार्ता) : प्रवाशांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *