Sunday , July 26 2026
Breaking News

काँग्रेसचे युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांच्या चालकावर प्राणघातक हल्ला

Spread the love

 

बेळगाव : महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पुत्र काँग्रेसचे युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांच्या कारचालकावर अज्ञात व्यक्तींनी चाकूहल्ला केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी बेळगावातील क्लब रोड परिसरात घडली आहे.
या हल्ल्यात बसवंत कडोलकर (वय ३२) असे जखमी चालकाचे नाव असून, हल्ल्यानंतर त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात दुर्दम्यांनी अचानक बसवंत यांच्यावर चाकूने वार करत घटनास्थळावरून पलायन केले. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथकही तैनात करण्यात आले आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मृणाल हेब्बाळकर यांनी स्वतः रुग्णालयात जाऊन जखमी चालकाच्या उपचारांची योग्य ती व्यवस्था केली.
या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांकडून अधिक सतर्कता बाळगण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *