Monday , September 21 2026
Breaking News

रस्त्याकडेला असहाय्य जखमी पडलेल्या वृद्धाला सामाजिक कार्यकर्त्यांचा दिलासा

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव रेल्वे स्थानकाजवळ रस्त्याकडेला असहाय्य जखमी अवस्थेत झोपून असलेल्या एका वृद्ध इसमाला सामाजिक कार्यकर्त्यांनी आज मंगळवारी सकाळी माणुसकीच्या दृष्टिकोनातून हॉस्पिटलमध्ये दाखल करून दिलासा दिला.

याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, शहरातील सामाजिक कार्यकर्ते ॲलन विजय मोरे, अवधूत तुडवेकर व संतोष दरेकर यांना बेळगाव रेल्वे स्थानकाजवळ एक वृद्ध इसम रस्त्याकडेला पडून असल्याची माहिती मिळाली. सदर माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले. तेंव्हा ती वृद्ध व्यक्ती असहाय्य अवस्थेत पडली होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती देण्याबरोबरच रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. त्यानंतर विनाविलंब त्या जखमी वृद्धाला तातडीच्या वैद्यकीय उपचारांसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी देखील त्या वृद्धावर त्वरित उपचार सुरू केले. ही बचाव मोहीमेत ॲलन विजय मोरे, अवधूत तुडवेकर, संतोष दरेकर, राजू टक्केकर, निलेश हिरेओळी, मायकल पिंटो, रुग्णवाहिका चालक आणि त्यांना मदत करणाऱ्या इतर स्वयंसेवकांचा सहभाग होता.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *