Tuesday , March 3 2026
Breaking News

बोरगाव आर. के. नगरमध्ये कुपनलिका खुदाईचा प्रारंभ

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील प्रभाग क्रमांक ५ मधील आर.के. नगरमध्ये उन्हाळ्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन कुपनलिका खुदाईचा प्रारंभ सहकाररत्न उत्तम पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष पिंटू कांबळे उपस्थित होते.
उत्तम पाटील यांनी,नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देत विकासकामांना सातत्याने चालना देण्यात येत आहे. जनतेच्या हितासाठी विकासाची कामे हीच खरी सेवा आहे. विविध कामामुळे आर. के. नगरच्या प्रगतीकडे आणखी एक सकारात्मक पाऊल असल्याचे सांगितले.
यावेळी नगरसेवक अभयकुमार मगदूम, जावेद मकानदार, तुळशीदास वसवाडे, अमर शिंगे, पी.के.पी.एस.चे संचालक सुमित रोड्ड, शिवाजी भोरे, नेताजी महाजन, खाजा मकानदार, राजू कांबळे, शरद मोरे, बबलू कांबळे, बाळू मकानदार, मोहसीन मकानदार, मेघनाथ मधाळे, अमोल महाजन, मज्जीद मकानदार, ताहीर बुरके, बाबासो उर्फ गोटू कांबळे यांच्यासह नगरसेवक व प्रभागातील नागरिक व महिला उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी अक्कोळ रोडवर ‘बर्निंग’ व्हॅनचा थरार

Spread the love  नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले चालकाचे प्राण निपाणी (वार्ता) : भरधाव जाणाऱ्या मारुती व्हॅनने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *