Tuesday , March 3 2026
Breaking News

निपाणीत १४ पासून सीनियर लिजेंडरी लीग टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा

Spread the love

 

सिनियर क्रिकेटर्स असोसिएशनतर्फे आयोजन ; अडीच लाख रुपये खर्चाची स्पर्धा

निपाणी (वार्ता) : येथील सिनियर क्रिकेटर्स असोसिएशन आणि धनलक्ष्मी क्रेडिट सौहार्द संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सिनियर लिजेंडरी (४० वर्षावरील) आंतरराज्य लिग टेनिसबॉल डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे बुधवारपासून (ता.१४) करण्यात आले आहे. बेळगाव जिल्ह्यात प्रथमच येथील म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर दिवस-रात्र प्रकाश झोतात होणाऱ्या या स्पर्धेसाठी एकूण अडीच लाख रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती सीनियर क्रिकेटर्स असोसिएशनचे संचालक व माजी नगरसेवक मज्जिद सय्यद यांनी दिली. येथील शासकीय विश्रामधामात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
स्पर्धेतील विजेत्या संघाला रोख ५१ हजार रुपये आणि चषक तर उपविजेत्या संघाला रोख २५ हजार रुपये आणि चषक देण्यात येणार आहे. तर उपांत्य फेरीतील पराभूत संघांना ७००१ रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. याशिवाय मॅन ऑफ दि सेरीज साठी ३००१ रुपये, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट विकेट किपर, बेस्ट फिल्डर अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच साठी प्रत्येकी २००१ रुपयांचे बक्षीसे आहेत. स्पर्धेत बेळगाव, कोल्हापूर, जमखंडी, कराड, जयसिंगपूर, मुधोळ, चिकोडी, निपाणी येथील निवडक १६ संघ सहभागी झाले आहेत.
बुधवारी (ता.१४) टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष संयोजित उर्फ निकू पाटील, नगरसेवक विलास गाडीवड्डर, बाळासाहेब देसाई- सरकार, सभापती डॉ. जसराज गिरे, मैनुद्दीन मुल्ला, सचिन गारवे, नावेद देसाई, बसवराज जडी, र्शद बागवान, सोहेल बागवान, इरफान महात, राजु मेहता, रविभूषण, अमर वाडकर, विनायक फुटाणकर, बबन चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन होणार असल्याचे अनिल भोसले यांनी सांगितले. यावेळी राजू नाईक, सचिन बागी, समीर मुजावर, रमेश शिंदे, उदय पोवार, पिंटू चव्हाण, किशोर लांडगे यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी अक्कोळ रोडवर ‘बर्निंग’ व्हॅनचा थरार

Spread the love  नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले चालकाचे प्राण निपाणी (वार्ता) : भरधाव जाणाऱ्या मारुती व्हॅनने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *