Tuesday , March 3 2026
Breaking News

ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये जिंकण्याची जिद्द

Spread the love

 

अण्णासाहेब हावले : वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

निपाणी (वार्ता) : ग्रामीण भागात अनेक प्रतिभावंत खेळाडू असूनही त्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ मिळत नाही. क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून त्यांची क्षमता सिद्ध करण्यात येते हे ओळखून विद्यासागर शिक्षण संस्थेकडून नेहमीच ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात येत आहे. राष्ट्रीय व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत ग्रामीण भागातील खेळाडू यश मिळवीत आहेत. या पुढील काळातही अशा खेळाडूंना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे मत येथील विद्यासागर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब हावले यांनी व्यक्त केले. ते येथील विद्यासागर शिक्षण संस्थेच्या संजय कॉलेज ऑफ फार्मसी व आयटीआय कॉलेजच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करून ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ज्योत व क्रीडा ध्वजारोहण करण्यात आले.
अण्णासाहेब हावले म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रातही आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सदृढ समाज निर्मितीत फार्मसी विद्यार्थ्यांचा मोलाचा वाटा आहे. फार्मसी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही क्रीडा स्पर्धेचे आयोजन करून त्यांच्या अंगी असलेल्या क्षमता सिद्ध करण्यासाठी क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून संधी देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी ऐश्वर्या हावले, बाबासाहेब पाटील, बाळासाहेब बसन्नवर, विद्याधर अम्मन्नावर, शिवाप्पा माळगे, रावसाहेब तेरदाळे, अण्णासाहेब बारवाडे, भाऊसाहेब पाटील, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.संदीप मुरताळे, आयटीआय कॉलेजचे प्रिन्सिपल तुषार बोरगावे, राजू खिचडे, दर्शन पाटील, प्रिती मगदूम, सुजित लाटवडे, प्राजक्ता खोत, अपेक्षा कोगनोळे, रमेश हिंग्लजे, वर्षा हिंगलजे, अभि मानगावे, विनायक तळंदगे, चैतन्य पुजारी, दीपक उपाध्ये, रम्या सावंत यांच्यासह विद्यासागर शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, विद्यार्थी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘पंचहमी’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सहकार्य करावे

Spread the love  गॅरंटी योजना कमिटी अध्यक्ष रमेश जाधव ; निपाणी तालुका पातळीवरील बैठक निपाणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *