Monday , September 21 2026
Breaking News

जालगार मारुती मंगल देवालय ट्रस्टतर्फे रविवारी मोफत आरोग्य तपासणी

Spread the love

 

बेळगाव : चव्हाट गल्ली येथील जालगार मारुती मंगल देवालय ट्रस्टतर्फे रविवार दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये सांधेदुखी, कंबर दुखी, मान दुखी, फ्रॅक्चर हार्ड, संधिवात, सांधिरोग, हाडांची झीज व ठिसूळपणा, गुडघेदुखी, जोडदुखी व मणक्याच्या हाडांची तपासणी इत्यादीवर तपासणी करून सल्ला देण्यात येणार आहे. या शिबिरात नमह आर्थोकेअर सदाशिव नगर बेळगावचे डॉक्टर रोहन उदय किल्लेकर, एमबीबीएस एमएस व डॉक्टर पुजा रोहन किल्लेकर एमबीबीएस एमएस हे हाडांच्या रोगावरील तज्ञ डॉक्टर आपल्या सहकार्यासमवेत तपासण्या करणार आहेत. बेळगावातील संबंधित रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जालगार मारुती देवस्थान ट्रस्ट चव्हाट गल्ली बेळगाव यांच्यावतीने करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *