निपाणी (वार्ता) : स्तवननिधी येथील पार्श्वनाथ ब्रह्मचार्याआश्रम गुरुकुल आश्रमाचा ८७ वा वार्षिक उत्सव आणि ब्रम्हनाथ विशाळी अमावस्या यात्रा शनिवारी (१७) आणि रविवारी(ता.१८) रोजी होणार आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजकांनी दिली.
वार्षिकोत्सव कार्यक्रमात जिनरत्न रोटे यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार समारभ, बालविकास मंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम शनिवारी सायंकाळी ५ वाजता होणार आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रकाश हुक्केरी, एफ. यु. पुजेर, आर. एस. सीतारामु, गटशिक्षणाधिकारी, महादेवी नाईक, तहसीलदार सुरेश मुंजे, प्रविण नंदा यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
रविवारी (ता.१८)सकाळी ८ वाजता श्री १००८ भगवान पार्श्वनाथ महामूर्तीचा चरणाभिषेक व विधान, सायंकाळी ५ वाजता विज्ञान प्रयोगशाळा व संगणक कक्षचा उद्घाटन सोहळा, सायंकाळी ६ वाजता प्राथमिक व माध्यमिक विभागाचा सांस्कृतिक कार्यक्रम तम्मण्णा पडसलगी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून आमदार शशिकला ज्वोल्ले, संगिता शहा, किरण पाटील, बाबासाहेब पाटील, मंडल पोलीस निरीक्षक बाळाप्पा तळवार, लक्ष्मी कांबळे, दादासाहेब पाटील भरमु बेडगे, उपनिरीक्षक शिवानंद कार्जोळ, अशोक लक्ष्मण झेंडे हे उपस्थित राहणार आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta