Monday , September 21 2026
Breaking News

निपाणीत १६ रोजी निघणार स्वामी समर्थ पालखीची भव्य मिरवणूक

Spread the love

 

संयोजन कमिटीची माहिती; दर्शनासाठी यंदा जादा एक दिवस

निपाणी (वार्ता) : अक्कलकोट स्वामी समर्थ पादुकांचे शुक्रवारी (ता. १६) रोजी निपाणीत आगमन होणार आहे. यावेळी त्यानिमित्त मध्यंतरी खंडीत झालेली पालखी मिरवणूक यंदा होणार आहे. याशिवाय एक दिवस दर्शनासाठी जादा मिळणार आहे. त्याचा निपाणी व परिसरातील स्वामी समर्थ भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन निपाणी फुटबॉल अकॅडमी आणि राजमनी ट्रॅव्हल्सतर्फे प्रतीक शहा आणि सचिन फुटाणकर यांनी केले आहे. मंगळवारी (ता.१३) आयोजित बैठकीत ते बोलत होते.
दरवर्षी पादुकांचे आगमन कार्यक्रमाला दिला जाणारा वेळ अपुरा मिळत असल्याने अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मेंजयराजे भोसले व राजेंद्र गायकवाड व पदाधिकाऱ्यांना सांगून पाठपुरावा केला होता. समितीने निपाणीतील पादुका परिक्रमाचा कालावधी वाढवून तो दोन दिवसांपर्यंत वाढवून दिला आहे. या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. अशोक नगर येथील कित्तूर चन्नम्मा चौकात सकाळी ९ वाजता स्वामी समर्थ पादुका, पालखीचे आगमन झाल्यावर स्वागत करण्यात येईल. त्यानंतर पादुका भाविकांना दर्शनासाठी आंदोलननगर मधील स्वामी समर्थ मंदिरात विसावणार आहेत. येथे सकाळी ९ ते १० पर्यंत दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.
सकाळी ११.३० वाजता अमलझरी रस्त्यावरील श्री स्वामी समर्थ मंदिरात पादुका असून तेथे एक तास दर्शनासाठी ठेवल्या जाणार आहेत. दुपारी १.३० वाजता चन्नम्मा चौकात दर्शनासाठी पालखी आणि पादुका ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर प्रसादाचे वाटप होणार आहे. दुपारनंतर चन्नम्मा चौक, अशोक नगर, कोठीवाले कॉर्नर, गुरुवार पेठ मार्गे व्यंकटेश मंदिरापर्यंत सर्वाधिक मिरवणूक काढण्यात येणार आहे. येथे दर्शन सोहळा होणार असून पहाटे विधीवतपणे महाअभिषेक होणार आहे. तेथून पादुका पालखी व्यायाम शाळा परिसरातील शरद थिटे यांच्या निवासस्थानी विसावणार आहे.
बैठकी प्रसंगी सोमनाथ शिंदे, कपिल शिंदे, ओंकार शिंदे, रणजित माने, करण माने, आशिष भाट, आकाश खवरे, अक्षय जयकर, गणेश घोडके, प्रशांत आजरेकर, राहुल निंबाळकर, संकेत पिसाळ उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *