
सहकाररत्न उत्तम पाटील; अक्कोळमध्ये विविध विकास कामांचा प्रारंभ
निपाणी (वार्ता) : सार्वजनिक ठिकाणी काम करत असताना टीकाटिप्पणी ही होत असते. त्याकडे फारसे लक्ष न देता गावच्या विकासासाठी काम करणे महत्त्वाचे आहे. अक्कोळ ग्रामपंचायतीने विविध नवनवीन उपक्रम राबविण्यासह कौतुकास्पद कामगिरी करत गावचा विकास साधला आहे. निष्क्रिय व्यक्तीवर टीका होत नसून काम करणारे व्यक्तीवरच होते. हे लक्षात ठेवून पुढील वाटचाल करावी. राबवलेल्या विकास कामांचे फळ म्हणून पुढील वेळी जनता तुम्हालाच निवडून देईल, असा विश्वास सहकाररत्न उत्तम पाटील यांनी व्यक्त केला. अक्कोळ ग्रामपंचायतीच्या १५ व्या वित्त आयोगातून आयोजित विविध विकास कामांच्या प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्ष इंद्रजीत सोळांकुरे होते.
उत्तम पाटील म्हणाले, सन २०२० पासून गावातील वरिष्ठ ज्येष्ठांच्यामार्गदर्शनाखाली विकास कामे सुरू आहेत. जनतेने दिलेल्या संधीचे सर्वच पदाधिकाऱ्यांनी सोने करावे. आपल्या कारकिर्दीत विकासात्मक कामे केल्यास मतदार पुढच्या पाच वर्षासाठी पोहचपावती दिल्याशिवाय राहणार नाहीत. जोमाने काम करून २३ पैकी २३ सदस्य निवडून येण्यासाठी आपण पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी इंद्रजीत सोळांकुरे, युवराज पाटील, राजू पाटील, स्नेहल स्वामी यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी अक्कोळ पाहिला बस थांबा ते मराठी मुलींच्या शाळेपर्यंतच्या रस्त्याचे “छत्रपती शिवाजी महाराज रस्ता” असा नामकरण सोहळा उत्तम पाटील यांच्या हस्ते पार पडला. त्यानंतर गावातील गल्लींच्या नावांचे फलक आनावरण, पंतप्रधान आवास घरकूल मंजुरी पत्र वितरण,भारतीय सैन्य दलात नव्याने भरती झालेल्या युवकांचा सत्कार, एससी,एसटी शिष्यवृत्ती, एससी, एसटी मरनोत्तर मदत निधी, कन्यादान आहेरचे व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
कार्यक्रमास ग्रामपंचायत उपाध्यक्षा शारदा कोळी, निरंजन पाटील सरकार, दिलीप पठाडे, माणिक कुंभार, संतोष मोहिते, दीपक कोळी, विवेकानंद सोळांकुरे, बाबासो अस्वले, इम्रान मकानदार, राजगोंडा पाटील, मलगोंडा पाटील, चेतन स्वामी, निशीकांत कुरळुपे, सुहास पठाडे, निवृत्ती वारके, प्रदीप पाटील, अनिता पाटील, उज्वला मोहिते, स्वाती मगदूम, यांच्यासह ग्रामपंचायतीचे आजी-माजी सदस्य, विविध संघ संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. बाबुराव मलाबादे यांनी सूत्रसंचालन केले.
Belgaum Varta Belgaum Varta