Friday , April 17 2026
Breaking News

गर्लगुंजी- बेळगाव बससेवा पुन्हा सुरू; शाळा, कॉलेज मुलांचा आणि कामगारांचा प्रश्न सुटला

Spread the love

 

खानापूर : बेळगाव येथे सकाळी 8 च्या वेळेत असणाऱ्या शाळा कॉलेज आणि कामगार लोकांना बसच्या गैरसोयीमुळे अडचण निर्माण झाली होती. यापूर्वी गर्लगुंजी गावाची बस व्यवस्था खानापूर आणि बेळगाव येथे जाणाऱ्या येणाऱ्या बसेस सुरळीत होत्या. नंतर बेळगाव येथे सकाळी जाणारी बस तोपिनकट्टीपर्यंत जाऊ लागली, त्यामुळे कामगार वर्ग विद्यार्थी याना वेळेत पोहचता येत नव्हते. पण नंतर गर्लगुंजी ग्राम पंचायत आणि पंच हमी खानापूर अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांचा पाठपुरावा आणि पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या पत्रावरून आज सकाळी बस च नियोजन झाले आणि गर्लगुंजी – बेळगाव बसची सुरुवात झाली.
बस सकाळी 7 वाजता खानापूर येथून निघणार आहे आणि 7.15 ला गर्लगुंजी आणि 8 वाजता बेळगाव येथे पोहचणार आहे..
त्याचबरोबर संध्याकाळी 5.30 वाजता सीबीटी बेळगाव येथून सुटणार आहे. त्यामुळे 5 ची बस चुकलेले विद्यार्थी आणि उद्यमबाग, मजगाव, मच्छे येथील कामगार वर्गाला याचा लाभ होणार आहे. त्याचबरोबर बरगाव, भंडरगाळी, सन्नहोसुर, निडगल या गावच्या विद्यार्थी आणि प्रवाशांना याचा लाभ होणार आहे
आज गर्लगुंजी गावात बसचे आगमन झाले गावकऱ्यांनी बसची पुष्प हार घालून पूजा केली आणि चालक किरण पवार, कंडक्टर रवी पाटील आणि पंच हमी खानापूर तालुका अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांचे शाल, पुष्पहार श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी माजी चेअरमन गोपाळ पाटील, ग्राम पंचायत अध्यक्ष ललिता कोलकार, उपाध्यक्षा रेखा कुंभार, सदस्य अजित पाटील, हणमंत मेलगे, प्रसाद पाटील, सुरेश मेलगे, अनुराधा निटूरकर, वंदना पाटील, अन्नपूर्णा बुरुड, सविता सुतार, पी.के.पी. एस. चेअरमन संजय पाटील, निर्देशक संतोष पाटील, विनोद कुंभार, एस डी एम सी अध्यक्ष गोकुळ चौगुले, सदस्य मोहन भातकांडे, मारुती मेलगे, जयसिंग पाटील, परशराम बेळगावकर, रामचंद्र लोहार, शंकर पाखरे, सहदेव मेलगे, मारुती गोरे, परशराम सुतार, चंद्रकांत भातकांडे, संदीप मेलगे, राहुल पाटील, कृष्णा यलारीचे, यल्लाप कुंभार,अनंत मेलगे,महेश करेगार,जोतिबा कुंभार,परशराम कुंभार, संजय कोलकार, अभय पाटील, अनिल मेलगे, विट्टल कुंभार, लक्ष्मण पालकर, गोविंद कुंभार, लक्ष्मण मेलगे, मधूकर पाटील, शिवराम कोलकार, संजय कोलकार, लक्ष्मण पालकर, राजू कोलकार, आनंद हम्पनवर, निवृत्ती मेलगे आणि विद्यार्थी ग्रामस्थ या कर्मक्रमाला उपस्थित होते
डीसी के एस आर टी सी, डेपो मॅनेजर संतोष बेंकनकोप पालकमंत्री सतीश जारकीहोळी, काँग्रेस नेत्या अंजली निंबाळकर यांचे गर्लगुंजी ग्रामस्थानी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

हलशी – हलशीवाडी लक्ष्मीयात्रेचे औचित्य साधून ग्रामस्थांच्या वतीने प्रकाश मरगाळे आणि अंकुश केसरकर यांचा सत्कार

Spread the love  खानापूर : हलशी – हलशीवाडी लक्ष्मीयात्रेचे औचित्य साधून ग्रामस्थांच्या वतीने महराष्ट्र एकीकरण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *