Tuesday , March 3 2026
Breaking News

सुसज्ज क्रीडांगण निर्मितीसाठी मुख्यमंत्र्यापर्यंत प्रयत्न करणार

Spread the love

 

बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे ; डॉ. आंबेडकर क्रीडांगणच्या फलकाचे उद्घाटन

निपाणी (वार्ता) : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून देशवासीयांना यांना न्याय दिला आहे. या त्यांच्या नावे निपाणीत सुज्ज क्रीडांगण करण्याची मागणी बऱ्याच वर्षांपासून होती. आता त्याच्या पूर्ततेसाठी खासदार, पालकमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांपर्यंत प्रयत्न करणार असल्याचे मत बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी व्यक्त केले.
जत्राट वेस परिसरातील सर्व्हे नंबर १७८ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणासाठी दोन एकर जागा मंजूर आहे.तेथे ् नामफलकाचे उद्घाटन करून ते बोलत होते.
चिंगळे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन झाले. चिक्कोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे, सुजय पाटील,टाऊन प्लॅनिंग कमिटी अध्यक्ष निकु पाटील हस्ते नामफलकास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
चिंगळे म्हणाले, नगरपालिकेच्या सहा एकर पैकी दोन एकर जागा पदवीपूर्व महाविद्यालयास, दोन एकर नगरपालिका कर्मचारी निवासस्थानासाठी तर उर्वरित दोन एकर क्रीडांगणासाठी मंजूर झाली आहे. या तिन्ही जागांचा एकत्रित प्रस्ताव मंजूर करण्याच्या सूचना जिल्हा धिकाऱ्यांना दिल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लोकेश घस्ते यांनी, पंधरा वर्षांपूर्वी क्रीडांगण निर्मितीसाठी जागा देण्याचा ठराव नगरपालिकेत मंजूर झाला. मात्र या जागेला अजूनही नाव मिळाले नव्हते. त्यासाठी दलित समाजाला संघर्ष करावा लागल्याचे सांगितले.
यावेळीजीवन घस्ते, शुभम माने, शंकर सोनटक्के, किसन दावणे, प्रवीण हेगडे, प्रकाश कांबळे, शशिकांत कांबळे, तानाजी कांबळे, अरविंद वाळके, रोहित कांबळे, रितेश जाधव, पवन कांबळे,
राजू कांबळे, अरबाज कांबळे, प्रमोद वाइंगडे, निलेश श्रीखंडे, अक्षय ताते, रामा सोनटक्के यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. मोहन घस्ते यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी अक्कोळ रोडवर ‘बर्निंग’ व्हॅनचा थरार

Spread the love  नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले चालकाचे प्राण निपाणी (वार्ता) : भरधाव जाणाऱ्या मारुती व्हॅनने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *