Sunday , September 20 2026
Breaking News

वैश्यवाणी समाज महिला मंडळाचा वर्धापन दिन व हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न

Spread the love

 

बेळगाव : येथील वैश्यवाणी समाज महिला मंडळाच्या वतीने मंडळाचा वर्धापन दिन व हळदीकुंकू कार्यक्रम तसेच नवीन कार्यकारणी स्थापना सोहळा असा संयुक्त कार्यक्रम गोवावेस येथील श्री राजाराम मठात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी 2026-28 सालाकरिता वैश्यवाणी महिला मंडळाच्या अध्यक्षपदी सौ. वर्षा सटवाणी, उपाध्यक्षा सौ. शुभांगी देवलापूरकर तर सचिवपदी सौ. मंजुषा देवलापूरकर यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच उपसचिव अश्विनी कलघटगी, खजिनदार उज्वला बैलूर, तर उपखजिनदार प्रणाली कपिलेश्वरी यांची निवड करण्यात आली.
प्रारंभी कार्यक्रमाचे सुरुवात ईश्वर प्रार्थनेने झाली. त्यानंतर वैश्यवाणी समाज महिला मंडळाच्या 33 व्या वर्धापनादिनानिमित्त माजी अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर माजी सेक्रेटरी वैशाली पालकर यांनी कमिटीच्या कार्याचा आढावा मांडला. यावेळी मावळत्या अध्यक्षा सौ. अंजली किनारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले व नवीन कमिटीला शुभेच्छा दिल्या. व त्यानंतर नवीन कार्यकारणीची घोषणा करण्यात आली तसेच सर्व पदाधिकारी व सदस्यांचा रोप भेट देऊन गौरव करण्यात आला. यावेळी नूतन अध्यक्षा सौ. वर्षा सटवानी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाने रंगत आणली. वैश्यवाणी समाजातील विविध वयोगटातील महिलांनी महिलांनी वैयक्तिक तसेच सांघिक गटात नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली, यावेळी उपस्थित महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. राधिका कोरगावकर व सौ. सुनिता हणमशेठ यांनी केले. शेवटी आभार प्रदर्शन व अल्पपहाराने कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैश्यवाणी महिला मंडळाच्या सर्व नूतन व माजी कमिटी, सर्व सभासद व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *