Tuesday , March 3 2026
Breaking News

छत्रपती धर्मवीर संभाजीराजेंच्या पुतळा सुशोविकरणासाठी खासदार प्रियांका जारकीहोळी यांना निवेदन

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी म्हणून संभाजीराजांनी केलेले कार्य अविस्मरणीय आहे. त्यांनी स्वराज्यासाठी शत्रूंविरुद्ध केलेल्या सर्व १२० लढाया करून जिंकल्या आहेत. भारतीय समुदायाला एकत्र आणणाऱ्या आणि विशेषतः तरुणांना राष्ट्रीय एकता आणि एकतेसाठी प्रेरित करणाऱ्या त्यांच्या महान मूल्यांचा प्रसार करण्यासाठी त्यांच्या जयंती आणि पुण्यतिथीचे स्मरण त्यांच्या नावावरुन केले जाते. त्यांच्या आठवणी जिवंत ठेवण्यासह त्यांच्या जीवन कार्याने पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देण्यासाठी श्री छत्रपती संभाजीराजे चौकाचे सौंदर्यीकरण करण्याच्या मागणीसाठी छत्रपती धर्मवीर संभाजी राजे युवक समाजसेवा संघातर्फे खासदार प्रियांका जरकीहोळी यांना माजी नगरसेवक संजय सांगावकर व मान्यवरांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.
निवेदनातील माहिती अशी, येथील बस स्थानक जवळील धर्मवीर छत्रपती संभाजीराजे चौकाच्या मध्यभागी असलेले हायमास्ट यंत्रणा चिक्कोडी-कोल्हापूर रस्त्याच्या कोपऱ्यावर हलवणे आवश्यक आहे. त्यासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. ती मदत करून संघटनेला पाठिंबा द्यावा. बऱ्याच वर्षापासून रखडलेल्या या कामाला प्रारंभ करून मराठा बांधवांना दिलासा देणे आवश्यक आहे. छत्रपती संभाजी राजांच्या कार्याची आठवण करून दरवेळी कार्यक्रम साजरा केला जातो. पण केवळ प्रतिमापूजन करणे योग्य वाटत नाही. त्यासाठी पुतळ्यासह सुशोभीकरणाची गरज आहे. या महत्त्वाच्या कामासाठी खासदारांनी पुढाकार घेऊन मराठा समाजाची मागणी पूर्ण करण्याचे आवाहनही निवेदनात करण्यात आले आहे.
खासदार प्रियंका जारकीहोळी यांनी, निवेदन स्वीकारून आपल्या खासदार फंडासह वडिल पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना याबाबतची माहिती घेऊन कामाची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले. यावेळी बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, सुजय पाटील, राजेश कदम, रवींद्र शिंदे, बसवराज पाटील, राजेंद्र वडर, प्रतीक शहा, दिलीप पठाडे, संदीप चावरेकर, दीपक वळीवडे यांच्यासह मराठा समाजातील नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी अक्कोळ रोडवर ‘बर्निंग’ व्हॅनचा थरार

Spread the love  नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले चालकाचे प्राण निपाणी (वार्ता) : भरधाव जाणाऱ्या मारुती व्हॅनने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *