व्यावसायिक सिलिंडर दरात ११२ रुपयांची वाढ ; व्यावसायिकांसह ग्राहकांच्या खिशाला कात्री
निपाणी (वार्ता) : चपाती भाजीसाठी निपाणीतील हॉटेल प्रसिद्ध आहेत. शहरात कोणत्याही कामासाठी आलेली व्यक्ती चपाती भाजी खाऊनच परतते. दूरवरून आलेले पाहुणेही या चपाती भाजीचा आस्वाद घेऊन जातात. महागाईमुळे चपाती भाजी व इतर हटिलिंग पदार्थ महागले आहेत.
डिसेंबर २०२५ मध्ये व्यवसायिक गॅस सिलेंडर १६१६ रुपयाला मिळत होता. जानेवारी २०२६ मध्ये त्यामध्ये ११२ रुपयांनी वाढ झाली असून १९ किलो वजनाचा गॅस सिलिंडर घेण्यासाठी आता १७२८ रुपये द्यावे लागत आहेत. दरवाढीमुळे चपातीभाजी आता ५० रुपयांवर गेली आहे. त्यामुळे निपाणीतील हॉटेलसह धाबे, लॉज, चहा टपरी वइतर व्यावसायिक आणि त्यांच्या ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे.
त्यामुळे हटिल व्यवसाय करणाऱ्यांना गॅसऐवजी भट्टी पेटवावी लागणार आहे.
——————————————————————–
‘मागील अनेक वर्षापासून आपला हॉटेल व्यवसाय आहे. दिवसेंदिवस गॅसची दरवाढ होत आहे. त्यामुळे लाकूड भट्टीवर हॉटेलचे पदार्थ करण्याची वेळ आली आहे. पदार्थांचे दर वाढविल्यास ग्राहक संख्या कमी होतील. त्यामुळे सरकारने व्यावसायिक गॅस दरवाढ मागे घ्यावी.’
– बाळासाहेब जासुद, हॉटेल व्यावसायिक, निपाणी
——————————————————————-
खाद्यपदार्थांचे दर का वाढले?
* व्यावसायिक सिलिंडर दरात ११२ रुपयांची वाढ
* खाद्य तेलाचे दरही वाढले
* डाळी, पिठाच्या दरवाढीचा परिणाम
* आचारी, हॉटेल कर्मचाऱ्यांची पगार वाढ
——————————————————————-
एक नजर…
* तेल, गॅस दरवाढीने हॉटेलिंग महागले
* शहरात १८ हॉटेलमध्ये चपाती भाजी
* चपाती भाजी ३५ वरून ५० रुपये
* मिरची, कांदा भजी ३० रुपये प्लेट
* पुरी भाजी ३० वरून ४० रुपये
* पुलावा २० वरून ३० रुपये
* वडा पाव १५ वरून २३ रुपये
Belgaum Varta Belgaum Varta