Monday , September 21 2026
Breaking News

स्वयंपाक घरातील फोडणी महागली

Spread the love

 

खाद्यतेलासह शेंगदाण्याचे भाव कडाडले; महिलांचे बजेट कोलमडले

निपाणी (वार्ता) : सहा महिन्यांपासून स्थिर असलेले खाद्यतेल आणि शेंगदाण्याचे भाव आता गगनाला भिडले आहेत. निपाणीत १० दिवसांपासून सुरू असलेल्या या दरवाढीमुळे सर्वसामान्य कुटुंबीयांचे बजेट कोलमडले असून, गृहिणींमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. सोयाबीन, सूर्यफूल आणि शेंगदाणा तेलाच्या किमतींत किलोमागे १८ ते २७ रुपयांची वाढ झाली आहे.
केवळ सुटे तेलच नव्हे, तर १३ किलोच्या डब्यामागेही २०० ते ३०० रुपयांची वाढ झाली आहे. १८०० रुपयांचा सोयाबीन डबा आता २००० रुपयांच्या पुढे गेला आहे. हीच गत शेंगदाण्याची असून पंधरा दिवसांपूर्वी १०० ते १२० रुपये किलोने मिळणारे शेंगदाणे जवळपास १४० ते १५० रुपये किलोच्या घरात गेले आहेत. यात कल्याणी, टॅग व घुंगरू आदी प्रकारच्या शेंगदाण्यांचा समावेश आहे.
——————————————————————–
‘आम्ही किरकोळ विक्रेते माल संपेपर्यंत भाव बदलत नाही. मात्र नवीन माल भरताना वाढीव दराचा फटका बसतो. या भाववाढीचा सर्वाधिक फायदा मोठ्या ठोक व्यापाऱ्यांनाच होतो.’
-विजय सोळंकी, किराणा व्यापारी, निपाणी
——————————————————————-
‘स्वयंपाकघरात तेल आणि शेंगदाण्याशिवाय पर्याय नसतो. यात काटकसर करणे कठीण असल्याने महिन्याचे किराणा बजेट पूर्णतः विस्कळित झाले आहे.’
-संध्या वाघमारे, गृहिणी, निपाणी
——————————————————————–
तेलाचा प्रकार जुना दर –  नवीन दर
* सोयाबीन १३५ – १५५
* सूर्यफूल १५० – १७०
* शेंगदाणा १७० – २००

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *