
चांद शिरदवाडमध्ये गंगा कल्याण योजनेचा प्रारंभ
निपाणी (वार्ता) : सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी यांना केंद्रबिंदू म्हणून आमदार शशिकला जोल्ले व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले हे कार्यरत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांसाठी पानंद रस्ते, गंगा कल्याण, पाणी योजना राबवून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारच्या अनेक महत्त्वकांक्षी योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांची ते नेहमीच प्रयत्न आहेत. मध्यम आणि लहान शेतकऱ्यांना अनेक योजनांचा लाभ मिळत आहे.जोल्ले दांपत्त्यामुळेच मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होत असल्याचे मत शिरदवाड ग्रामपंचयात उपाध्यक्ष अण्णा पाटील यांनी व्यक्त केले. चांद शिरदवाड येथील शेतकरी रावसाहेब कांबळे यांना मंजूर झालेल्या गंगा कल्याण योजना कामाच्या प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर संजू पाटील यांनी, गट, तट राजकारण न करता विकासात्मक धोरण डोळ्यासमोर ठेवल्याने निपाणी मतदारसंघाचा विकास होत असल्याचे सांगितले. कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य सुरेश खोत, अमर कांबळे, शितल लडगे, पिंटू लडगे, किरण पडलाळे अप्पासाहेब, इंगळे अजित तोडकर, मोरेश्वर सुतार, रवींद्र स्वामी, महावीर लडगे, सचिन पडलाळे, नारायण हिरवे, शिवाजी रूपाळे, शीतल पाटील, अनिल पाटील, जावेद मुजावर सुभाष पाटील, अनिल पुजारी यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta