Tuesday , March 3 2026
Breaking News

ढोकळा, पाणीपुरी, भेळ, लस्सी, शिरा, उपमासह बरेच काही

Spread the love

 

मराठा मंडळमध्ये रंगला खाद्य महोत्सव ; ६० विद्यार्थिनींनी घेतला सहभाग

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील मराठा मंडळ संचलित, बालवाडी, मराठी विद्यानिकेतन प्राथमिक शाळा आणि मराठा मंडळ हायस्कूलया संयुक्त विद्यमाने मराठा मंडळाच्या पटांगणात खाद्य महोत्सव रंगला. त्यामध्ये तब्बल ६० विद्यार्थिनींनी सहभाग घेऊन ढोकळा, पाणीपुरी, भेळ, सँडविच, लस्सी, कटलेट, शिरा, उपमा, सोलकढी, ताक, मठ्ठासह अनेक पदार्थ बनवून विक्रीसाठी ठेवले होते. या महोत्सवाला पालकासह परिसरातील नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.
माजी नगराध्यक्षा शुभांगी जोशी, अमृता पंकज पाटील, दर्शना शाह, कोल्हापूरच्या सुवर्णकार माधुरी चौगुले, चिक्कोडीच्या उद्योजिका पोवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते खाद्य महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी मराठा मंडळ शिक्षण समितीच्या संचालिका ज्योती राजेश कदम, शिक्षण समिती अध्यक्ष राजेश कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
शुभांगी जोशी, अमृता पाटील यांनी या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यवसाय कौशल्य, आत्मविश्वास व स्वयंरोजगाराची आवड निर्माण होते. विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटीतून सादरीकरण केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक गुणधर्म दिसून येत असल्याचे मत व्यक्त केले.
खाद्य महोत्सवाबरोबरच आयोध्या मोरबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली
कुलिंग आर्ट, पेपर आर्ट व वायर आर्टचे सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी कागद व वायरपासून स्वतः तयार केलेल्या दागिनेव कलाकृतींचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. एस. डी. साखळकर यांनी खोडरबर व पेन्सिलच्याया साहाय्याने चित्र साकारण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. याशिवाय रंगीत चित्रांचेही स्वतंत्र प्रदर्शन आयोजित केले होते. विविध स्पर्धेतील यशस्वी पहिल्या पाच क्रमांकांच्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना पेन व वह्या देण्यत आल्या.
कार्यक्रमास मुख्याध्यापक डी. डी. हळवणकर, बी. आर. मोहिते, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पाटील, व्ही. व्ही. पत्की, जे. आर. खपले, ए. एम. यादव, के. एल. कांबळे, के. एस. देसाई, अर्चना पाटील, प्रियांका पाटील, मुकुंद कोरे, एस. एस. पाटील, जी. एस. पाटील, पी. एस. घाटगे, एस. बी. कांबळे यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पालक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी अक्कोळ रोडवर ‘बर्निंग’ व्हॅनचा थरार

Spread the love  नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले चालकाचे प्राण निपाणी (वार्ता) : भरधाव जाणाऱ्या मारुती व्हॅनने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *