Tuesday , March 3 2026
Breaking News

‘रेणुका देवीच्या नावानं चांगभलं’ च्या गजरात बेनाडीतील रेणुका यात्रा सौंदत्तीकडे रवाना

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बेनाडी(ता.. निपाणी )येथील श्री रेणुका देवी विश्वस्त कमिटीतर्फे आयोजित रेणुका देवीची यात्रेसाठी येथील मानाच्या जगासह भाविक बुधवारी रात्री (ता.११) सौंदत्तीकडे रवाना झाले. तत्पूर्वी येथील रेणुका मंदिरपासून गावातील प्रमुख मार्गावरून मानाच्या जगाची सर्वाधिक मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर मंदिरात जगाची पूजा करून कापूर लावून सुमारे २१६ भाविक बस मधून सौंदत्तीकडे रवाना झाले.
रेणुका देवी विश्वस्त कमिटीचे अध्यक्ष सातगोंडा जनवाडे, उपाध्यक्ष बाळासाहेब देशिंगे, सेक्रेटरी राजन फतरे व मान्यवरांच्या हस्ते बसचे पूजन करण्यात आले. गुरुवारी (ता.१२) सकाळी आठ वाजता नवल तीर्थ येथे स्नान करून दुपारी बारा वाजता सौंदत्ती डोंगरावरील रेणुका देवीच्या मंदिरात कापूर लावण्यात आला. शुक्रवारी (ता.१३) दुपारी पुरणपोळी व कडब्याचा नैवेद्य दाखवून कापूर लावून यात्रा साजरी करण्यात येणार आहे. रात्री दोन वाजता भाविक बेनाडी येथे परतणार आहेत. त्यानंतर दुपारी बारा वाजता येथील रेणुका मंदिराजवळ कापूर लावण्यात येणार आहे. त्यानंतर भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवून गडपुरी यात्रा साजरी होणार असल्याचे विश्वस्त कमिटीने कळविले आहे.
यावेळी विश्वस्त कमिटीचे शिवगोंडा पाटील अण्णासाहेब घाटवडे, अमित देशमुख, अनिल शहा, सत्याप्पा हजारे, विजय देशिंगे, शिवाजी परीट, विक्रांत गोरे, अमित वराळे, रणजीत कोळी, शांताबाई परीट, गौराबाई परीट, सुजाता दिशेंगे, सुरेखा लोहार यांच्यासह भाविक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी अक्कोळ रोडवर ‘बर्निंग’ व्हॅनचा थरार

Spread the love  नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले चालकाचे प्राण निपाणी (वार्ता) : भरधाव जाणाऱ्या मारुती व्हॅनने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *