

अरुण निकाडे; कुर्ली हायस्कूलमध्ये अभ्यास संनियंत्रण समितीची स्थापना
निपाणी (वार्ता) : दहावी परीक्षेचा निकाल चांगला लगण्यासाठी अभ्यासपूरक विविध उपक्रम राबविले जात आहेत. विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात अभ्यास करून चांगले यश संपादन करावे, असे मत अरुण निकाडे यांनी व्यक्त केले. कुर्ली येथील रयत शिक्षण संस्थेच्या सिद्धेश्वर विद्यालयामध्ये तहसीलदार सुरेश मुंजे यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास संनियंत्रण समितीची (अभ्यास देखरेख समिती) स्थापना कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानावरुन तेम्हणून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामसेवक रमेश हंजी होते.
मुख्याध्यापक एस. एस. चौगुले यांनी, प्रस्ताविकात या समितीचा प्रमुख उद्देश दहावीच्या निकाल वाढीसाठी संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये कुर्ली परिसरात दहावी विद्यार्थ्यांच्या घरातील टीव्ही व मोबाईल बंद करण्याबाबत सर्व पालकांमध्ये जागरूकती केली आहे. विद्यार्थ्यांमध्येपरिक्षेविषयीची भीती कमी करून अभ्यासाची आवड निर्माण केल्याचे सांगितले. व्यासपीठावरील मान्यवारांच्या हस्ते दिपप्रज्वलन झाले. एस. ए. पाटील यांनी विद्यार्थ्याच्या दहावी निकाल वाढीसाठी राबविण्यात आलेलू उपक्रमाची माहिती दिली. या समितीचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक एस. एस चौगुले, एस. ए. पाटील यांची निवड करण्यात आली. पद्मजा जाधव- ग्रामपंचायत विकास अधिकारी एस. आर. कोळी, बालविकास विभाग पर्यवेक्षक के बी बन्ने-समूह संपन्मुल व्यक्ती, तलाठी रमेश हंजी, आरोग्य अधिकारी डॉ. सलीम मुजावर, अरुण निकाडे, संदीप गाडीवड्डर, विश्वनाथ पाटील, नानासाहेब पाटील यांची सदस्यांची अभ्यास संनियंत्रण समितीवर निवड करण्यात आली.
ग्रामसेवक रमेश हंजी, के. बी. बन्ने, नानासाहेब पाटील, विश्वनाथ पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कुर्ली ग्रामपंचायतु तर्फे जनजागृतीसाठी गावातून दवंडी दिली जाणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी पद्मजा जाधव यांनी सांगितले. कार्यक्रमास श्रीनिवास पाटील, के. डी. पाटील, भरत पाटील, अरुण पाटील, शीतल ढगे यांच्यासह अंगणवाडी शिक्षिका, विद्यार्थी उपस्थित होते. टी. एम. यादव यांनी सूत्रसंचालन केले. ए. ए. चौगुले यांनी आभार मानले.


Belgaum Varta Belgaum Varta