Monday , June 1 2026
Breaking News

बोरगाव जय गणेश विविधउद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी संघाचे शनिवारी उद्घाटन

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील शेतकरी व ऊस उत्पादकांना वेळेत पत मिळावे, त्यामधून त्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या उद्देशाने येथे जय गणेश विविध उद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकार संघाची स्थापना केली आहे. त्याचा उद्घाटन सोहळा शनिवारी (ता.२१) होणार असल्याची माहिती संघाचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक अभयकुमार मगदूम यांनी दिली.
मगदूम म्हणाले,जय गणेश व गौरी -गणेश महिला सोसायटीच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात कार्य करीत सामाजिक बांधिलकी जपली आहे. या अनुषंगाने शहरातील सर्वसामान्य शेतकरी व ऊस उत्पादकांना जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून व कृषी खात्याकडून मिळणान्या सोयी सुविधा मिळाव्यात, यासाठी जय गणेश विविध उद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकार संघाची स्थापना केली आहे.नूतन संघाचे उद्घाटन नांदणी मठाचे स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य स्वामी, चिंचणी येथील सिद्ध संस्थान मठाचे उत्तराधिकारी शिवप्रसाद देवरु सदलगा येथील दरीखान आज्जा यांच्या दिव्य सान्निध्यात, सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
उद्घाटनाच्या निमित्ताने विविध ठेव योजनाची सुरुवात करण्यात येणार असल्याचे मगदूम यांनी सांगितले. यावेळी संघाचे अध्यक्ष तेजपाल मगदूम, उपाध्यक्ष प्रकाश चौगुले, संचालक आदिनाथ जंगटे, दादासाहेब हवले, विठ्ठल ऐदमाळे, उमर अपराज, गणेश वास्कर, उदय महाजन, त्रिशाला बसन्नावर, दिलीप गोसावी, सायली बडीगेर, संघाचे सीईओ काडेश चनगौडनवर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव नाक्यावरील जलवाहिनीला दुरुस्तीनंतरही गळत

Spread the love  शहर विस्तारले पण पाणी प्रश्न सुटेना निपाणी (वार्ता) : निपाणी शहराचा विस्तार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *