Monday , June 1 2026
Breaking News

स्तवनधीतील गुरुकुल आश्रमातील सातवी, दहावी विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ संचलित निपाणी स्तवनिधी येथील श्री पार्श्वनाथ ब्रह्मचर्याश्रम गुरुकुल मधील अरुण शामराव पाटील हायस्कूल आणि पी. जी. विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने ७ वी आणि १० वीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ पार पडला. बी. बी. दादन्नावर यांनी स्वागत केले. संचालक महावीर पाटील व चिक्कोडी येथील डाएटचे निवृत्त प्राचार्य मोहन जिरगीहाळ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.
मोहन जिरगीहाळ यांनी, द्रोणाचार्यांच्या कथेद्वारे गुरु–शिष्य परंपरेचे महत्त्व समजावून सांगितले. शिक्षणाचे जीवनात अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले. प्रत्येक विद्यार्थ्याने शिक्षण गांभीर्याने घ्यावे घ्यावे. शाळा ही केवळ शिक्षण देणारी जागा नसून जीवन घडवणारी संस्कार शाळा आहे. येथे मिळालेले संस्कार, शिस्त व मूल्ये आयुष्याला दिशा देणारी ठरणार असल्याचे सांगितले.
संचालक महावीर पाटील यांनी, गुरुदेव समंतभद्र महाराज यांच्या विचारांचा उल्लेख करून विद्यार्थ्यांना सदाचार व शिस्तीचे महत्त्व पटवून दिले.
फक्त गुणांपेक्षा धार्मिक क्षेत्र आणि समाजसेवाला विद्यार्थ्यांनी महत्व दिले पाहिजे. आपले विचार आत्मविश्वासाने व्यक्त करण्याची क्षमता विकसित करण्याचे आवाहन केले. यावेळी विद्यार्थ्यांनु मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास मुख्याध्यापक एस. एस. तेरदाळ, जे. डी. कोरडे, श्री. टी. ए. घोसारवाडे, आर. जी. सौंदलगी यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.बी. एस. स्वामी यांनी सूत्रसंचालन केले, पी. आर. मोळे यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव नाक्यावरील जलवाहिनीला दुरुस्तीनंतरही गळत

Spread the love  शहर विस्तारले पण पाणी प्रश्न सुटेना निपाणी (वार्ता) : निपाणी शहराचा विस्तार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *