Sunday , July 26 2026
Breaking News

कॅन्टोन्मेंट प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात

Spread the love

 

बेळगाव : मातृभाषेतून शिक्षण हा जीवनाचा पाया असून मराठी शाळेमध्ये शिक्षण घेणे हे मातृभाषेचे ऋण फेडण्यासारखे असून मातृभाषेतून शिक्षण माणसात माणुसपण निर्माण करते. कॅन्टोन्मेंट शाळा ही एक उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाते, याचा पालकांनी आपल्या मुलांना मराठीतून शिक्षण देण्यासाठी लाभ घ्यावा असे आवाहन मराठा मंदिरचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव यांनी केले.

कॅन्टोन्मेंट मराठी प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन लोकमान्य रंगमंदिर येथे पार पडले. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व मुलांच्या स्वागत गीताने झाली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आप्पासाहेब गुरव, कॅन्टोन्मेंटचे सदस्य सुधीर तुपेकर, शाळेचे ब्रँड अँबेसिडर संतोष दरेकर, सिआरपी बसवराज कम्मार, शाळेचे मुख्याध्यापक पी.एस.बिर्जे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांना स्मृतिचिन्ह, ग्रंथ व पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापक पी. एस. बिर्जे यांनी वार्षिक अहवाल वाचन केले. त्यानंतर वर्षभर शाळेमध्ये आयोजित विविध शैक्षणिक उपक्रम, क्रीडा स्पर्धा, परीक्षा यामध्ये अव्वल येणाऱ्या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी शाळेचे माजी शिक्षक, देणगीदार एन. आर. पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
त्यानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला यामध्ये बालगीत, देशभक्तीगीत, लोकगीत, जिजाऊ शिवरायांच्यावर आधारित बहारदार नृत्य अविष्कार मुलांनी सादर करून उपस्थित पालकांची वाहवा मिळविली. शैक्षणिक वर्ष 2025-26 चे शाळेचे आदर्श विद्यार्थी वेदांत जयराम रेडकर तर आदर्श विद्यार्थिनी म्हणून श्रेया लक्ष्मण गावडे यांना गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक तुषार कांबळे, धनाजी कुरणे यांनी केले तर सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदय पाटील, नीता गुंजिकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक श्रीकांत काटकर, मनीषा वड्डगोळ, राहुल कांबळे, रेणुका अंबी, रेणुका सरमळकर यांनी परिश्रम घेतले. यावेळी शाळेचा पालकवर्ग मोठया संख्येने उपस्थित होता.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *