Tuesday , March 3 2026
Breaking News

कोगनोळीजवळ अपघातात ट्रक-ट्रेलरचे नुकसान

Spread the love

कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या पाटील मळ्याजवळ मालवाहू ट्रक व ऊस वाहतूक ट्रॅक्टर यांच्यात अपघात झाला. ही घटना रविवार तारीख 6 रोजी सकाळी सातच्या सुमारास घडली.
अपघातामध्ये ट्रकचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, निपाणीकडून कागल येथील छत्रपती शाहू कारखान्यास ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रेलर पाटील मळा जवळ आला असता मालवाहू कंटेनर ट्रक पाठीमागील बाजूने जोराची धडक दिली. या घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी ट्रकचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. घटनास्थळी निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी भेट देऊन पाहणी केली.
अपघातग्रस्त वाहने जय हिंद रोड डेव्हलपर्स ज्या कर्मचाऱ्यांनी क्रेनच्या साह्याने बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करून दिला.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी अक्कोळ रोडवर ‘बर्निंग’ व्हॅनचा थरार

Spread the love  नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले चालकाचे प्राण निपाणी (वार्ता) : भरधाव जाणाऱ्या मारुती व्हॅनने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *