निपाणी बाजारपेठेत अनेक ठिकाणी विक्री; चाव्यासह नानाविध प्रकारात उपलब्ध
निपाणी (वार्ता) : यंदा फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून बदलत्या हवामानाने निपाणी शहर, उपनगरे आणि ग्रामीण भागांत तापमानवाढीची चाहूल लागली. ऊन, वारा आणि ढगाळ वातावरणामुळे वातावरणात गर्मी वाढली आहे. आता मार्च महिन्यात उन्हाची तीव्रता वाढले आहे. त्यापासून गारवा मिळवण्यासाठी नागरिक थंड पाण्यास पसंती देत आहेत. परंतु फ्रिजपेक्षा मातीच्या माठातील पाणी आरोग्यास चांगले असल्याने शहर व ग्रामीण भागात माठांना मागणी वाढली आहे. त्यापासून वर निपाणी बाजारपेठेत विविध ठिकाणी नानाविध प्रकाराचे माठ उपलब्ध झाले आहेत.
सध्या उन्हाचा चटका जाणवू लागल्याने शहर व उपनगर परिसरातील नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी मातीचे माठ खेरेदीला आतापासूनच सुरुवात केली आहे. शहरात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आले आहे.
शहरांतील कमाल तापमान साधारण २७ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. परिसरात तापमानात वाढ झाल्याने सध्या उन्हाळ्याची चाहूल व चटका जाणवत आहे. एप्रिल-मे महिन्यांत जाणवणारे उन्हाचे चटके मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच जाणवत आहेत. मातीच्या माठात लवकर पाणी थंड होते. काळे रंगाचे माठ काळ्या मातीपासून तयार केल्यामुळे ते काळे रंगाचे माठ म्हणून बाजारपेठेत खरेदीसाठी विक्रीसाठी ठेवले आहेत
——————————————————————–
माठांचे प्रकार / माठाच्या किंमती
*साधा माठ * १५० -२०० रुपये
*राजस्थानी माठ * २५० ते ३५०
*लाल माठ *२२५ ते ३०० रुपये
*बिगर तोटीचा माठ * २०० ते ३०० रुपये
*तोटीचा माठ * ३४० ते ४५०
*मातीची बाटली १०० ते २००
*रांजन २६० ते ६०० रुपये
——————————————————————–
‘लाल रंगाचे माठ हे भट्टीमध्ये भाजल्यामुळे ते लाल रंगाचे दिसतात व वजनाला हलके असतात. या लाल रंगाच्या माठात नैसर्गिकरीत्या पाणी लवकर थंड होते. म्हणून सध्या बाजारात या मातीच्या माठाला ग्राहकांची मागणी वाढली आहे.
-तुकाराम कुंभार, माठ विक्रेते, गडहिंग्लज
Belgaum Varta Belgaum Varta