Friday , March 13 2026
Breaking News

‘दावत-ए-इफ्तार’मध्ये बंधुभावाचे दर्शन

Spread the love

 

सहकाररत्न उत्तम पाटील यांच्यातर्फे आयोजन, हिंदू-मुस्लिम बांधवांची उत्स्फूर्त उपस्थिती

निपाणी (वार्ता) : मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यानिमित्त येथील दर्गाह गल्लीमध्ये बोरगावमधील सहकाररत्न उत्तम पाटील यांच्यातर्फे रमजान निमित्त दावत-ए-इफ्तारचे आयोजन करण्यात आले. गुरुवारी (ता. १२) सायंकाळी मशीद समोर झालेल्या या कार्यक्रमाला हिंदू-मुस्लिम समाजबांधव उपस्थित राहून बंधुभावाचे दर्शन घडवले.
रमजान महिन्यात रोजा सोडण्याच्या वेळी सर्व समाजातील नागरिकांनी एकत्र येऊन सामाजिक ऐक्य आणि सलोखा वृद्धिंगत व्हावा, या उद्देशाने या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांनी एकत्रितपणे इफ्तार करत परस्परांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मुस्लिम समाजातर्फे सहकाररत्न उत्तम पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
सहकारत्न उत्तम पाटील यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून अशा उपक्रमांमुळे समाजात ऐक्य, बंधुता आणि सौहार्दाचे वातावरण अधिक दृढ होत असल्याची भावना व्यक्त केली. कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.
यावेळी शेरू बडेघर, जाफर बागवान, रवींद्र शिंदे, दिलीप पठाडे, दोस्तमोहम्मद पठाण, इरफान महात, इम्रान मकानदार, शौकत जमादार, इर्शाद कोच्चरगी, रईस सोलापुरे, विनायक वडे, नजीर कोच्चरगी, शकील बागवान, अर्षद बागवान, जुबेर बागवान, जावेद कुन्नुरे, मोहम्मद खानापुरे यांच्यासह हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते. शरीफ बेपारी यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

सिदनाळ सन्मती विद्यामंदिर शाळेत दहावी विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ

Spread the love  निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ संचलित सिदनाळ आहेत सन्मती विद्यामंदिर येथील सन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *