निपाणी (वार्ता) : येथील श्रीनगर मधील अंकुरम इंग्लिश मिडीयम स्कूलमधील सर्व शिक्षक व कर्मचारी सर्व स्टाफ हा महिलांचा आहे. शाळेमध्ये नर्सरी ते पाचवीपर्यंत इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जाते. शाळेच्या स्थापनेचा मुळात उद्देशच असा होता की ग्रामीण भागातील व शहरी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे याच उद्देशाने या शाळेची निर्मिती झाली. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार व महिला कर्मचाऱ्यांनी नाटकाचे सादरीकरण केले. शाळेच्या संस्थापिका चेतना चौगुले या मुख्याध्यापिका पासून ते सेविका पर्यंत सर्व जबाबदाऱ्या महिलाच पार पाडत आहेत. त्यांच्या योगदानमुळे या परिसरात शाळेची ओळख, संस्कार, संस्कृती, गुणवत्ता व व्यावहारिक ज्ञान विद्यार्थ्यांना दिली जाते. त्यामुळे महिला वर्गाचे योगदान हे महत्त्वपूर्ण खाल्याचे संस्थापक अमर चौगुले यांनी सांगितले.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शाळेतील शिक्षिकांनी नाटीकेचे सादरीकरण केले. त्यामध्ये आदर्श मुलगी घडवण्यासाठी सर्व पालकांनी पुढाकार घेऊन मुलींना शिक्षण दिले पाहिजे. आणि मुलींनीही शिकले पाहिजे, हा संदेश नाटकाच्या माध्यमातून देण्यात आला. यावेळी ज्योती चवई, रेणुका गवळी, पूजा वसेदार, निकिता ऐवाळे, स्वाती पठाडे यांच्यासह शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते.