व्यवसायिकांचेही दुतर्फा अतिक्रमणे; प्रवाशांसह दुचाकी वाहनधारकांची कसरत
निपाणी (वार्ता) : दररोज हजारो नागरिकांसह वाहनांची वर्दळ येथील बसस्थानक परिसरात असते. ग्रामीण आणि शहरातील नागरिकांसाठी बसस्थानक जोडणारे रस्ते सातत्याने गर्दीने फुलून जात आहेत. तरीही रस्त्याच्या दुतर्फा झालेल्या अतिक्रमणांमुळे नागरिक आणि वाहनधारक हैराण झाले आहेत. त्यामुळे बसस्थानकाला अतिक्रमणांचा वेढा पडल्याची स्थिती आहे.
बस स्थानकाच्या चारही बाजूला अतिक्रमण करून उभारलेल्या अनेक पान टपऱ्या व इतर साहित्य विक्रेते आहेत. याशिवाय निरंतरपणे रस्त्याच्या कडेला थांबून फेरीवाले आपला व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे आधीच अरुंद असलेल्या रस्त्यावर अतिक्रमण वाढत चालले आहे. परिणामी लहान मोठे अपघात होत आहेत.
अतिक्रमित अनेक दुकानांच्या समोर ग्राहक दुचाकीही उभ्या केल्या जात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
बसस्थानकालगत अंडा भुर्जी, चिकन लॉलीपॉपची दुकाने थाटली आहेत. त्यामुळे येथे वाहतूक कोंडीचा त्रास नेहमी सहन करावा लागतो.
——————————————————————–
‘बस स्थानक परिसरात आधीच प्रवाशांनी विद्यार्थ्यांची घाई असते. त्यामुळे स्थानक परिसरातील रस्ते मोकळे असावेत. त्या दृष्टीने नगरपालिका, आगार प्रमुख आणि पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेऊन नागरिकासह वाहनधारकांना दिलासा द्यावा.’
–प्रा.राजन चिकोडे, माजी सभापती, निपाणी नगरपालिका
Belgaum Varta Belgaum Varta