Sunday , April 5 2026
Breaking News

निपाणीतील जुना पी. बी. रोडला शिवाजी महाराजांचे नाव देण्यासाठी पालकमंत्र्यांना निवेदन

Spread the love

 

 

निपाणी (वार्ता) : येथील महत्त्वाच्या असलेल्या बेळगाव नाका ते कोल्हापूर वेस या रस्त्याला पुणे बेंगलोर रोड म्हणून ओळखले जाते. आता या रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष संयोजित उर्फ निकु पाटील यांनी पालकमंत्री सतीश जळकेवाडी यांची गोकाक येथे भेट घेतली. शिवाय या रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराज असे नाव घेण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. त्यांच्या या मागणीचे निपाणी व परिसरातून स्वागत होत आहे. निवेदनातील माहिती अशी,
बेळगाव नाका ते कोल्हापूर वेस वरील दिवंगत दौलतराव पाटील नगर या रोडला पी.बी.रोड ऐवजी छत्रपती शिवाजी महाराज रोड आसे नामकरन व्हावे, अशी निपाणी परिसरातील अनेक नागरिकांची मागणी आहे. त्याची दखल घेऊनच काम करण्यासाठी निवेदन दिले आहे. या मागणी बाबत सतीश जारकीहोळी यांनी सकारात्मक भूमिका घेऊन नगरपालिका आयुक्त गणपती पाटील यांना दूरध्वनीवरुन व लेखी आदेश देत तात्काळ नामकरण करण्याची सूचना केली या सूचनेचे ‌सर्वत्र स्वागत होत आहे. यावेळी माजी नगरसेवक विनोद बल्लारी, इंद्रजीत जामदार,‌ बाळु शिंदे, सागर पाटील, अनिल श्रीखंडे यांच्यासह दौलतराव पाटील सोशल फाउंडेशन, मळा ग्रुपचे कार्यकर्ते व नागरीक उपस्थीत होते.

About Belgaum Varta

Check Also

सिद्धार्थ ढोणे महाराजांच्या भाकणूकीने बेनाडी बिरदेव यात्रेची उत्साहात सांगता

Spread the love  निपाणी (वार्ता) : बेनाडी येथे बिरदेव देवस्थान कमिटीतर्फे आयोजित बिरदेव यात्रेची सांगता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *