Sunday , April 5 2026
Breaking News

निपाणीतील जुन्या पी. बी. रोडचे शिवाजी महाराज रोड नामकरण करा

Spread the love

 

नागरिकांची मागणी; नगरपालिका आयुक्तांना निवेदन

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील महत्त्वाच्या असलेल्या बेळगाव नाका ईदगाह मैदान ते कोल्हापूर वेस या रस्त्याला पुणे- बेंगलोर रोड म्हणून ओळखले जाते. महामार्गाच्या रुंदीकरणामुळे आता शहराबाहेरून सर्व वाहने जाणार आहेत. त्यामुळे पूर्वीच्या जुन्या पी. बी. रोडला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव द्यावे. शिवाय कोल्हापूर वेस वरील उड्डाण पुलाला शहराचे पहिले नगराध्यक्ष दिवंगत दौलतराव पाटील यांचे नाव देण्याची मागणी शहरासह उपनगरातील नागरिकांनी केली आहे. याबाबतचे निवेदन सोमवारी (ता.२३) नगरपालिका आयुक्त गणपती पाटली यांना निपाणी टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष संयोजित उर्फ निकु पाटील, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील व मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
निकु पाटील म्हणाले, पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची गोकाक येथे भेट घेऊन या रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराज असे नामकरण करण्याच्या मागणीचे निवेदन दिले होते. तात्काळ पालकमंत्री जारकीहोळी यांनी आयुक्त गणपती पाटील यांच्याशी संपर्क साधण्यासह लेखी आदेश देत तात्काळ नामकरण करण्याची सूचना केली. त्यानुसार आता आयुक्तांनी त्वरित या रस्त्याचे नामकरण करण्याची मागणी केली.
सुप्रिया पाटील यांनी, शहरातील जुना पी. बी. रोड हा मुख्य रस्ता आहे. अजूनही तो जुना पी. बी. रोड म्हणूनच ओळखला जातो. आता यापुढी काळात नागरिकांच्या मागणीनुसार या रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यासाठी पालिका प्रशासनाने सहकार्य करण्याचे आवाहन केले. गोपाळ नाईक यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, रवींद्र शिंदे, दिलीप पठाडे, प्रशांत नाईक, शेरू बडेघर, बाळासाहेब जासूद, किरण कोकरे, अरुण आवळेकर, विनोद साळुंखे, दीपक वळीवडे, संजय कांबळे, किरण पाटोळे, विनोद बल्लारी, अस्लम शिकलगार, इंद्रजीत बगाडे, झाकीर कादरी, अनिल श्रीखंडे, विश्वास पाटील यांच्यासह आजी -माजी नगरसेवक व नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

सिद्धार्थ ढोणे महाराजांच्या भाकणूकीने बेनाडी बिरदेव यात्रेची उत्साहात सांगता

Spread the love  निपाणी (वार्ता) : बेनाडी येथे बिरदेव देवस्थान कमिटीतर्फे आयोजित बिरदेव यात्रेची सांगता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *