सुप्रिया पाटील; तालुका ब्लॉक काँग्रेस प्रचार समिती पदाधिकाऱ्यांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : राज्यातील काँग्रेस सरकारने निवडणुकीतील जाहीरनाम्यांची अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे तीन वर्षापासून राज्यातील जनतेला त्याचा लाभ होत आहे. अद्यापही अनेक योजना राज्य शासनाकडून अंमलात आणल्या जात आहेत. त्यामुळे कार्यकर्ते व मतदारांनी काँग्रेसच्या पाठीशी राहून पक्ष बळकटीसाठी संघटितपणे कार्य करावे. त्यामुळे भविष्यात पुन्हा काँग्रेस सरकार सत्तेवर येऊन विविध योजनांचा लाभ घेणे शक्य होणार असल्याचे मत कर्नाटक राज्य महिला काँग्रेस सरचिटणीस सुप्रिया पाटील यांनी व्यक्त केले. निपाणी तालुका ब्लॉक काँग्रेस प्रचार समिती पदाधिकाऱ्यांचा येथील काँग्रेस कार्यालयात सत्कार करण्यात आला. त्यावेळी पाटील बोलत होत्या.
किरण कोकरे यांनी स्वागत केले. त्यानंतर निपाणी तालुका ब्लॉक काँग्रेस प्रचार समिती अध्यक्ष संजय कांबळे-रासाई शेंडूर, उपाध्यक्ष बाबासाहेब किल्लेदार-अक्कोळ, महिला अध्यक्ष कल्पना पुजारी आणि निपाणी ब्लॉक सेवादल अध्यक्ष परविन नवाब यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला.
यावेळी टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष निकु पाटील, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, सुजय पाटील, अशोक पाटील-कोडणी, झाकीर कादरी, विश्वास पाटील, प्रशांत नाईक, किसन दावणे, विनोद बल्लारी, रवींद्र श्रीखंडे, बाबू घस्ते, संदीप इंगवले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta