Monday , September 21 2026
Breaking News

ओमनगरजवळ दुचाकीस्वार युवती थोडक्यात बचावली!

Spread the love

 

बेळगाव : ओल्ड पीबी रोडवरील ओमनगरच्या वळणावर सोमवारी सकाळी झालेल्या अपघातात दुचाकीस्वार युवती थोडक्यात बचावल्याची घटना घडली.

जुने बेळगावकडून येणारी टिप्पर ओमनगरकडे वळत असताना हा अपघात झाला. समोरून येणारी दुचाकी टिप्परच्या मागील चाकाखाली अडकली. मात्र, सुदैवाने दुचाकीस्वार युवती बाजूला पडल्याने तिचा जीव वाचला, तर दुचाकी चाकाखाली आली. अपघातानंतर टिप्पर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. केवळ दैव बलवत्तर असल्याने युवती या अपघातातून सुखरूप बचावली.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *