Sunday , April 5 2026
Breaking News

सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष सत्यनायक यांना मुख्यमंत्री पदक पुस्कार जाहीर

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथे मंडल पोलीस निरीक्षक म्हणून सेवा बजवलेले व सध्या बेळगाव येथे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून सेवा बजावणारे कर्तव्यदक्ष अधिकारी संतोष सत्यनायक यांना मुख्यमंत्री पदक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या प्रदीर्घ आणि प्रशंसनीय सेवेची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
मंडल पोलीस निरीक्षक संतोष सत्यनायक यांनी ११ जानेवारी १९९९ रोजी पोलीस उपनिरीक्षक म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. गेल्या २७ वर्षांपासून पोलीस विभागाची निष्ठेने सेवा केल्यामुळेत्यांना बढती मिळत गेली. ४ मे ला २०२१ पोलीस निरीक्षक या पदावरून पोलीस उपअधीक्षक पदावर पदोन्नती मिळाली. ४ सप्टेंबर २०२४ पासून बेळगाव येथे शहर सहाय्यक पोलीस आयुक्त शहर म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत ते शिस्त, वचनबद्धता आणि समाजात शांतता निर्माण करण्याचे काम केले आहे.
गंभीर गुन्ह्यांचा तपास करण्यात आणि मोठ्या गुन्ह्यांमध्ये आरोपींना शिक्षा सुनावण्यामध्ये त्यांना यश आले आहे.गणेशोत्सव, राज्योत्सव, रमजान, बकरीद सण आणि बेळगावच्या वार्षिक हिवाळी अधिवेशनात अत्यंत दक्षतेने शांतता आणि सुरक्षितता राखली आहे.
त्याच्या नेतृत्वाखाली बेळगाव उपविभागातील एकूण २२ प्रकरणांमध्ये सुमारे ४७ लाख, ९० हजार किमतीचे ७१५.७९ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करून ते संबंधितांना परत दिले आहेत. त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेऊनच हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

सिद्धार्थ ढोणे महाराजांच्या भाकणूकीने बेनाडी बिरदेव यात्रेची उत्साहात सांगता

Spread the love  निपाणी (वार्ता) : बेनाडी येथे बिरदेव देवस्थान कमिटीतर्फे आयोजित बिरदेव यात्रेची सांगता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *