
निपाणी(वार्ता) : बेळगाव गोमटेश विद्यापीठ संचलित येथील हनुमान नगरातील गोमटेश इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये महिलादिनाचे औचित्य साधून हायस्कूलच्या विद्यार्थिनींसाठी ‘महिलांचे आरोग्य आणि घ्यायची काळजी’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्रमुख वक्त्या म्हणून महेश एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या प्रा. प्रांजली ढेकणे उपस्थित होत्या. प्रारंभी संस्थेचे उपाध्यक्ष उदय पाटील यांनी स्वागत केले. प्रास्ताविक वैशाली देशमाने यांनी केले. आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनींसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुलींनी किशोर अवस्थेत पदार्पण करताना होणारे शारीरीक, मानसिक बदलांना सामोरे जाताना कसे आचरण ठेवावे. दररोज आहार काय घ्यावा. योग, ध्यान यांचा आपल्या जीवनावर कसा सकारात्मक प्रभाव पडतो. याचे सखोल मार्गदर्शन प्रा. ढेकणे यांनी केले. उपाध्यक्ष उदय पाटील यांनी सर्व महिला शिक्षिकांना पुष्प देऊन महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पाहुण्यांची ओळख प्राचार्या दीपाली जोशी यांनी करून दिली. वर्षा केनवडे यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्या ज्योती हरदी यांनी आभार मानले.
कार्यक्रमास विद्यार्थीनी आणि शिक्षीका उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta